लालू प्रसाद यादव यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

लालू प्रसाद यादव यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

सीबीआयनं माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

  • Share this:

08 जुलै: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. सीबीआयनं माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. सोबतच आयआरसीटीसीचे त्यावेळचे व्यवस्थापकीय संचालक आणि एका खासगी कंपनीच्या संचालकांविरोधातही गुन्हा दाखल केलाय.

2006मध्ये लालू रेल्वेमंत्री होते. त्यावेळी एका खासगी कंपनीला रेल्वेचं कंत्राट देताना नियम डावलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत दिल्ली, पाटणा, रांची, पुरी आणि गुडगावमध्ये १२ ठिकाणी सीबीआयं छापे टाकलेत. यापूर्वी लालूंची मुलगी मिसा भारती यांची आयकर विभागानं चौकशी केली होती. एक हजार कोटींच्या बेनामी मालमत्ताप्रकरणी त्यांची चौकशी झाली होती. याआधीही चारा घोटाळ्यात सीबीआयने दोषी ठरवल्यामुळे लालू प्रसाद यादवांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण ?

-लालू 2004 ते 2009 दरम्यान रेल्वेमंत्री होते

- 2006मध्ये रांची आणि पुरीतल्या रेल्वेच्या मालकीच्या हॉटेल्ससाठी IRCTCनं टेंडर काढलं होतं.

- हॉटेल्सचा विकास, देखभाल आणि चालवण्यासाठी 15 वर्षांसाठी टेंडर मागवण्यात आलं

-सुजाता हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडला हे कंत्राट मिळालं.

-सुजाता हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडनं त्यासाठी 15.45 आणि 9.96 कोटी दिले.

-हे कंत्राट देताना मोबदल्यात लालूंना दोन एकर जमीन मिळाल्याचा आरोप आहे.

-लालूंचे सहकारी प्रेमचंद गुप्ता यांच्या कंपनीला ही जमीन हस्तांतर करण्यात आली

-जमीन हस्तांतरणाशिवाय इतर कोणताही व्यवहार कंपनीच्या खात्यावर नाही

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 11:31 AM IST

ताज्या बातम्या