पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, अटक होण्याची शक्यता

पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, अटक होण्याची शक्यता

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली हायकोर्टानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानं त्यांच्यावर अटकेची तलवार लटकत आहे. सीबीआय आणि ईडीचं पथक मंगळवारी संध्याकाळी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं, पण तेव्हा ते घरात नव्हते. यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस लावलं. या नोटीसमध्ये पुढील दोन तासांच्या आत हजर होण्याचे आदेश दिले होते, पण तपास पथकासमोर हजर झालेच नाहीत. सीबीआयचं पथक चिदंबरम यांचा शोध घेत आहेत. चिदंबरम यांनी आपला मोबाइलदेखील स्विच ऑफ केला आहे.

(वाचा  : काँग्रेसचं आणखी एक घराणं निखळलं, निष्ठावंत नेत्या अडकणार शिवबंधनात! )

न्यायालयाचा जामीन देण्यास नकार

आयएनएक्स घोटाळा हा आर्थिक गैरव्यवहाराचा उत्तम नमुना आहे, असं न्यायालयानं म्हटलं. शिवाय, चिदंबरम केवळ राज्यसभेचे आहेत म्हणून त्यांना जामीन देणे योग्य नाही, असं सांगत न्यायालयानं त्यांचा जामीन फेटाळला. यामुळे सीबीआय आणि ईडीला त्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्रकरण भ्रष्टाचाराचे आहे आणि त्यात आता तडकाफडकी जामीन दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं.

(वाचा : उदयनराजे भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला पुन्हा धक्का?)

एअरसेल मॅक्सिसचा व्यवहार ३ हजार ५०० कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मीडिया खटल्यात ३०५ कोटी रुपयांचा संबंध आहे. चिदंबरम हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा हिरवा कंदिल वरील दोन्ही प्रकरणात दिला गेला होता. त्याच वेळी कथित गैरव्यवहार झाल्यामुळे चिदंबरम यांची त्यातील भूमिका चौकशी यंत्रणा तपासत आहेत.

(वाचा : पत्नीसोबत भांडण मग 1 महिन्याच्या बाळाचा काय दोष? चाकूने वार करून घेतला जीव)

नाना पटोलेंच्या 'या' निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मतभेद; पाहा SPECIAL REPORT

Published by: Akshay Shitole
First published: August 21, 2019, 7:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading