दोन दिवसाच्या चौकशीनंतर माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांना अटक

खाण माफिया आणि सर्वात श्रीमंत राजकारणी अशी ओळख असलेल्या जनार्दन रेड्डी यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2018 03:48 PM IST

दोन दिवसाच्या चौकशीनंतर माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांना अटक

बंगळुरू, 11 नोव्हेंबर : कर्नाटक राज्यातील खाण माफिया आणि सर्वात श्रीमंत राजकारणी अशी ओळख असलेल्या जनार्दन रेड्डी यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सेंट्रल क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे. उद्या (सोमवार) रेड्डी यांना बंगळुरू न्यायालयासमोर हजर केलं जाईल, अशी माहिती सेंट्रल क्राईम ब्रांचचे प्रमुख अधिकारी आलोक कुमार यांनी दिली आहे.

जनार्दन रेड्डी यांच्यावर 18 कोटींची लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता सेंट्रल क्राईम ब्रांचने रेड्डी यांना अटक केली आहे. कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्हा खाण माफियांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच जिल्ह्यातील श्रीमंत राजकारणी अशी रेड्डी बंधू यांची ओळख आहे. यापूर्वी जनार्दन रेड्डी यांना 2012 साली खाण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच ते जामीनावर बाहेर आले होते.

जनार्दन रेड्डी यांच्यासोबतच त्यांचा जवळचा सहकारी अली खान यालाही अटक करण्यात आलीय. ‘आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तसंच साक्षीदारही भक्कम असल्यामुळेच आम्ही रेड्डी यांना अटक केली आहे,’ अशी माहिती सेंट्रल क्राईम ब्रांचचे प्रमुख अधिकारी आलोक कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

कोण आहेत जनार्दन रेड्डी?

-कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील माजी आमदार

Loading...

-भाजपचे कट्टर समर्थक

-2006 सारी येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून कार्यरत

-कर्नाटक राज्यातील सर्वात श्रीमंत राजकारणी अशी ओळख

-आतापर्यंत 600 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

-खाण घोटाळ्याप्रकरणी तब्बल 42 महिन्यांचा कारावास

-कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी बेल्लारी मतदारसंघात जाण्यास रेड्डींवर होती बंदी


VIDEO : लोकवस्तीजवळ आढळला १० फुटांचा अजगर!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...