नवी दिल्ली, 17 जानेवारी : केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थातच CBI ने लाचखोरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. CBI च्या पथकाने आज देशातील एकूण 20 ठिकाणी छापेमारी करत रेल्वे विभागात चाललेला काळाबाजार समोर आणला आहे. याप्रकरणी सीबीआयने भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आणखी दोन साथीदारांना अटक केली आहे.
आरोपींवर 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून सर्व रक्कम परत मिळवली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीचं नाव महेंद्र सिंह चौहान असून ते 1985 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने कारवाई करत असताना सर्व रक्कम परत मिळवली आहे. रेल्वेतील विविध कामांचे कॉन्ट्रक्ट मिळवण्यामध्ये पक्षपात करण्यासाठी आरोपींनी एका खाजगी कंपनीला 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने एकावेळी देशातील एकूण 20 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये आसाम, दिल्ली, उत्तराखंड, त्रिपुरा आणि सिक्कीम आदी ठिकाणांचा समावेश आहे.
हे ही वाचा-
MBA पूर्ण झाल्यानंतर सुरू केलं अवैध काम; आता दिवसाला करतो 9 लाखांचा व्यवसाय
आसाममधील नॉर्थ इस्ट फ्रन्टीयर रेल्वेच्या (north east frontier railway) कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध कामांचे कॉन्ट्रक्ट्स एका खाजगी कंपनीला मिळवून देण्यासाठी आरोपींनी ही लाच मागितली होती. या प्रकरणाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने धडक कारवाई केली आहे. सीबीआयच्या पथकाने नॉर्थ इस्ट फ्रन्टीयर रेल्वेच्या आसाममधील मुख्य कार्यालयावर धाड टाकली आहे. येथून 1 कोटी रुपयांची सर्व रक्कम परत मिळवली आहे. नॉर्थ इस्ट फ्रन्टीयर रेल्वेचे मुख्यालय आसाममधील मालेगाव याठिकाणी आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे सापडतात का? या अनुषंगाने सीबीआय पुढील तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.