मराठी बातम्या /बातम्या /देश /

सीबीआयची मोठी कारवाई, लाचखोर अधिकाऱ्याला अटक करत कोट्यवधीची रक्कम जप्त

सीबीआयची मोठी कारवाई, लाचखोर अधिकाऱ्याला अटक करत कोट्यवधीची रक्कम जप्त

सीबीआयने विशाखापट्टणम येथे कारवाई करत एका लाचखोर कृषी अधिकाऱ्याला अटक केली. अधिकाऱ्यासोबत मध्यस्थी करणाऱ्या अन्य तीन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 17 जुलै : सीबीआयने एका लाचखोर कृषी अधिकाऱ्याला अटक केली आहे. कृषी मालाच्या निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारत असल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने केलेल्या कारवाईत 1 कोटी 86 लाख रुपयांची रक्कमही जप्त केली आहे. काय आहे घटना - सीबीआयने विशाखापट्टणम येथे कारवाई करत एका लाचखोर कृषी अधिकाऱ्याला अटक केली. अधिकाऱ्यासोबत मध्यस्थी करणाऱ्या अन्य तीन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. झाडांची रोपे, तसेच अन्य कृषी माल बोटीद्वारे परदेशात पाठविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येते. कृषी मालाच्या गुणवत्तेशी संबंधित असे हे प्रमाणपत्र असते. कृषी मंत्रालयाच्या विशाखापट्टणम येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या आर. पद्म सिंग या अधिकाऱ्याकडे हे प्रमाणपत्र जारी करण्याचा कार्यभार होता. सीबाआयला मिळाली होती माहिती - कृषी मंत्रालयाच्या विशाखापट्टणम येथील कार्यालयातील अधिकारी आर. पद्म सिंग हा अधिकारी हे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी मोठया प्रमाणात लाच घ्यायचा, अशी माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सीबीआयने सापळा रचला. यानंतर खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच घेताना पद्मसिंग याला अटक केली. हेही वाचा - मोठी दुर्घटना! 10 जणांना घेऊन जाणारी बोट पलटली; 8 जण बेपत्ता तर दोघांचा जीव वाचला पद्मसिंग याची विशाखापट्टणम येथे तीन घरे आहेत. सीबीआयने या तीनही घरांवर शनिवारी छापेमारी केली. यापैकी एका घरातून 1 कोटी 29 लाख रुपयांची रोकड सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. तर दुसऱ्या घरातून 56 लाख रुपयांची रोख रक्कम सीबीआयने जप्त केली.
First published:

Tags: Andhra pradesh, CBI, Crime news

पुढील बातम्या