केवळ परीक्षा टाळण्यासाठी 'त्यांनी' चिमुरड्या प्रद्युम्नची हत्या केली !

केवळ परीक्षा टाळण्यासाठी 'त्यांनी' चिमुरड्या प्रद्युम्नची हत्या केली !

परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली, खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे.

  • Share this:

08 नोव्हेंबर : गुरुग्राममधल्या प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं 11 वीतल्या मुलाला अटक केलीय. काल रात्री सीबीआयनं ह्या मुलाला अटक केली. यामुळे ह्या सर्व प्रकरणालाच आता वेगळं रूप धारण केलंय . परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली, खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे.

प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाल्याचाही सीबीआयने इन्कार केला आहे. परीक्षा आणि पालक-शिक्षिक मीटिंग टाळण्यासाठी हत्या करण्यात आली असं सीबीआयकडून सांगण्यात आलंय. यापूर्वी या प्रकरणी गुरगाव पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली होती आणि त्या वेळेला त्या कंडक्टरने प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार केल्याचं आणि त्याची हत्या केल्याचंही कबूल केलं होतं.

मात्र आता सीबीआयनं 11 वीतल्या मुलाला अटक केल्यानं अनेक नवे प्रश्न उभे राहिलेत.

काय आहे प्रकरण?

- 8 सप्टेंबर रोजी प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरून हत्या

- गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील घटना

- 7 वर्षांचा प्रद्युम्न हा दुसरी शिकत होता

- स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तिघांना अटक

- अशोक कुमारनं हत्या केल्याची दिली होती कबुली

- मात्र कोर्टात अशोक कुमारनं जबाब फिरवला

- दबावाखाली येऊन मी हत्येची कबुली दिली होती

- हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला

First published: November 8, 2017, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading