भारतात करोडपतींच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ

भारतात करोडपतींच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ

गेल्या चार वर्षांत 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली आहे. मुळात इनकम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत पण 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : या नोव्हेंबरमध्ये नोटबंदीला तीन वर्षं पूर्ण होतील. गेल्या चार वर्षांमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढून 1.46 लाख झाली आहे. त्याचबरोबर या काळात इनकम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत पण 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 कोटीहून जास्त उत्पन्न असणाऱ्यांची संख्या 2013-14 या वर्षात 88,649 होती. तीच संख्या 2017-18 यावर्षात 1,40,139 एवढी झाली.असे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने सांगितले आहेत.

सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी सांगितलं की, आर्थिक वर्ष 2017-18 यादरम्यान डायरेक्ट टॅक्सची संख्या मागील दहा वर्षांपेक्षा चांगली होती. गेल्या चार वर्षांत जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांची संख्या 80 टक्के वाढली आहे, तर चार वर्षाच्या कालावधित जवळपास एका वर्षाला 95 लाखांनी वाढ झाली आहे.वित्तीय वर्ष 2013-14 मध्ये 3.97 कोटी इतकी संख्या होती. वित्तीय वर्ष 2017-18 मध्ये 6.85 एवढी झाली आहे.

जास्त उत्पन्न असणारे आणि वयक्तिक कर दात्यांची संख्या 68 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. त्याचबरोबर जास्त उत्पन्न असणाऱ्यांच्या संख्येत पण जलद गतीने वाढ झाली आहे. यामध्ये कॉर्पोरेट, संस्था, हिंदू अविभाज्य कुटुंब आणि इतर यांचा जास्त समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2018 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading