मोदी सरकारचा भ्रष्टाचाऱ्यांना दणका, Income Taxच्या आणखी 15 अधिकाऱ्यांना सक्तिची निवृत्ती

आत्तापर्यंत 27 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना सक्तिती निृत्ती घ्यायला भाग पाडण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 06:26 PM IST

मोदी सरकारचा भ्रष्टाचाऱ्यांना दणका, Income Taxच्या  आणखी 15 अधिकाऱ्यांना सक्तिची निवृत्ती

नवी दिल्ली 27 सप्टेंबर :  भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांविरुद्ध केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोहिमेने आणखी वेग घेतलाय. नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने Central Board of Direct Taxes (CBDT) विभागातले आणखी 15 अधिकाऱ्यांना सक्तिची निवृत्ती (Compulsory Retirement)  घ्यायला भाग पाडलं. आत्तापर्यंत 27 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना सक्तिती निृत्ती घ्यायला भाग पाडण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यातच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या (सीबीआयसी) काही अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती घ्यायला लावली होती. यामध्ये अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश होता.

मारुतीच्या या कारची तब्बल 1 लाख रुपये कमी झाली किंमत, जाणून घ्या काय आहे कारण

प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी आणि निर्णयांची वेगाने अंमलबजावणी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. सरकारी सेवेत आल्यानंतर अधिकाऱ्यांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढणं शक्य नसतं. याच नियमांचा फायदा घेत अधिकारी निर्ढावले जातात अशी कायम ओरड होते. निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधींची दर पाच वर्षांनी परिक्षा असते. मात्र प्रशासन राबवणाऱ्या अधिकाऱ्यांचं उत्तरदायीत्व काय आहे? असाही प्रश्न कायम विचारला जातो.

विधानसभा पोटनिवडणूक : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के, 54 वर्षांचा बालेकिल्ला गमावला

सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिमा म्हणजे लालफीतशाहीचा कारभार अशी झाली आहे. फाईल्स लवकर निकाली न काढणं, निर्णय न घेणं, अडवणूक करणं यामुळे कामं आणि निर्णय लवकर होत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून शासनाची प्रतिमा खराब होते. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलंय.

Loading...

नियम 56 नुसार असा निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राला आहेत. ज्या अधिकाऱ्यांचं वय 50 ते 55 दरम्यान आहे आणि 30 वर्षांची त्यांची सेवा झालीय अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सक्तिची निवृत्ती दिली जावू शकते. यामुळे जास्तीची रोजगार निर्मितीही होणार आहे. वयाने ज्येष्ठ असलेले अधिकारी लवकर निवृत्त झाले तर तेवढ्याच नव्या जागा निर्माण होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...