मध्यप्रदेशात आता गायींनाही 'आधार कार्ड' !

मध्यप्रदेशात आता गायींनाही 'आधार कार्ड' !

मध्यप्रदेश - छत्तीसगडमध्ये आता चक्क गायींनाही आधार कार्ड योजना लागू करण्यात येणार आहे. तिथले पशुसवर्धन मंत्री अंतर सिंह यांनीच यासंबंधीची घोषणा केलीय. मध्यप्रदेशातील 4 जिल्ह्यांमध्ये प्राथमिक स्तरावर या 'गाय आधारकार्ड'ची योजना राबवली जातेय.

  • Share this:

धार, मध्यप्रदेश, 6 सप्टेंबर : मध्यप्रदेश - छत्तीसगडमध्ये आता चक्क गायींनाही आधार कार्ड योजना लागू करण्यात येणार आहे. तिथले पशुसवर्धन मंत्री अंतर सिंह यांनीच यासंबंधीची घोषणा केलीय. मध्यप्रदेशातील 4 जिल्ह्यांमध्ये प्राथमिक स्तरावर या 'गाय आधारकार्ड'ची योजना राबवली जातेय. या आधार कार्डमध्ये संबंधीत गायीच्या मालकाचं नाव, ती किती दूध देते, तीचं ठिकाण, यासोबतच्या तिच्या आरोग्यासंबंधीची माहिती फीड केली जाणार आहे.

मध्य प्रदेशात गायींचे आधार कार्ड बनवण्यासाठी पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. प्रारंभी धार, खरगोन, शाजापूर आणि आगर माळवा या चार जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाईल, त्याला अपेक्षित यश मिळालं तर राज्यभरात तिची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या गायींच्या 'आधार कार्ड योजनेमुळे त्यांची तस्करी रोखण्यासही मोठी मदत होणार असल्याचा दावा मध्यप्रदेश सरकारने दावा केलाय. कारण संबंधीत गायीचं आधार कार्ड बनवल्यानंतर तिच्या गळ्यात अथवा कानात रेडिओ फ्रिक्वेंसी आयडी चीफ लावली जाणार आहे.

दरम्यान, मध्यंतरी ही गायींची आधार कार्ड योजना जाहीर होताच सोशल मीडियातून त्यावर तीव्र टीकाही झाली होती तरीही मध्य प्रदेशच्या भाजप सरकारकडून ही योजना पुढे रेटली जातेय. भाजपवाल्यांना माणसांपेक्षा गायींचीच अधिक चिंता असल्याची बोचरी टीका 'नेटिझन्स'कडून होऊ लागलीय.

First published: September 6, 2017, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading