नरेंद्र मोदींनी ध्यान केलेल्या गुंफेचं बुकिंग हाऊसफुल्ल,जगभरातून होतेय चौकशी!

नरेंद्र मोदींनी ध्यान केलेल्या गुंफेचं बुकिंग हाऊसफुल्ल,जगभरातून होतेय चौकशी!

'ध्यान कुटीर' असं या गुंफेचं नाव आहे. मात्र आता ती मोदी गुंफा म्हणूनच ओळखली जाते.

  • Share this:

डेहराडून 22 मे : हिंदूंच्या चार धामांपैकी एक महत्त्वाचा आणि अवघड धाम असलेल्या केदारनाथ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्यान केलेली गुंफा आता जगभर प्रसिद्ध झालीय. 'ध्यान कुटीर' असं या गुंफेचं नाव आहे. मात्र आता ती मोदी गुंफा म्हणूनच ओळखली जाते. उत्तराखंडच्या गढवाल मंडल विकास निगमने पर्यटनाला चालना देण्यासाठी या गुंफेची निर्मिती केली होती. मोदींच्या ध्यानधारणेनंतर जगभरातून या गुंफेबाबत चौकशी होत असल्याची माहिती गढवाल विकास निगमचे महाव्यवस्थापक बी.एल.राणा यांनी सांगितलं.

या गुंफेचं बुकिंगही सुरू असून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथचा दौरा केला. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी या गुंफेत ध्यानधारणा देखील केली. पण, त्या गुंफेमध्ये आता तुम्हाला देखील ध्यानधारणा करता येणार आहे. विश्वास नाही बसत? त्यासाठी केवळ 999 रूपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. साडेबारा हजार फुट उंचीवर असलेल्या या गुहेत आता 999 रूपये मोजून तुम्हाला देखील ध्यानधारणा करता येणार आहे.

कशी आहे गुहा

ज्या गुहेत मोदींनी ध्यानधारणा केली ती गुंफा नव्यानेच बांधण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ विकास धामची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गुहा तयार करण्याचे निर्देश दिले होते. नरेंद्र मोदींनी ज्या गुहेत ध्यानधारणा केली त्या गुहेसाठी दिवसासाठी 999 रुपये मोजावे लागतात.  12250 फूट उंचीवर तयार करण्यात आलेली गुंफा नैसर्गिक नाही. ही गुंफा ध्यान आणि अध्यात्मिक शांततेसाठी तयार करण्यात आली आहे. गुहेत स्वच्छतागृह आणि वीज आहे. फोन किंवा इतर कुठलीही सुविधा नाही अशी माहितीही राणा यांनी दिलीय.

गढवाल मंडल विकास निगमच्या वेबसाईटवर जाऊन गुफेचं बुकिंग करता येतं. यात फक्त एक बेड असून बादली आणि मग एवढ्याच सुविधा आहेत. या गुंफेला एक खिडकी असून त्यातून केदारनाथाचं मंदिर दिसू शकतं. अध्यात्मिक साधना व्हावी आणि शांतता मिळावी यासाठीच या गुंफेची निर्मिर्ती करण्यात आली अशी माहितीही त्यांनी दिली.

Tags: kedarnath
First Published: May 22, 2019 09:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading