Home /News /national /

तब्बल 3 महिने क्वारंटाइन राहिल्यानंतर चीनहून आलेल्या 'त्या' मांजरीची अखेर सुटका

तब्बल 3 महिने क्वारंटाइन राहिल्यानंतर चीनहून आलेल्या 'त्या' मांजरीची अखेर सुटका

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

चीनहून आलेल्या खेळण्यांच्या कंटेनरमधून एक छोटंसं मांजरही (cat) भारतात आलं होतं.

    चेन्नई, 24 मे : 17 फेब्रुवारी, 2020 चीनहून आलेल्या खेळण्यांच्या कंटेनरमधून एक छोटंसं मांजरही (cat) भारतात आलं. मात्र कोरोनाव्हायरसच्या भीतीने ज्याप्रमाणे माणसांना क्वारंटाइन केलं जात होतं, त्याप्रमाणे या मुक्या जीवालाही क्वारंटाइनला सामोरं जावं लागलं. ही मांजर 15 दिवस किंवा 30 दिवस नव्हे तर तब्बल 3 महिने क्वारंटाइन होती. अखेर त्या मांजरीची आता सुटका झाली आहे. ती पूर्णपणे निरोगी आहे. पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल इंडियाने (PETA) सांगितल्यानुसार, चेन्नई कस्टम अधिकाऱ्यांनी 23 मे रोजी या मांजरीला कॅटीट्युट ट्रस्टकडे सोपवलं आहे. चेन्नईत 2005 पासून काम करणाऱ्या या संस्थकडे ही मांजर आता सुरक्षित आहे. 19 एप्रिलला केंद्र सरकारने चेन्नई अॅनिमिल क्वारंटाइन अँड सर्टिफिकेशन सर्व्हिसेसला (AQCS) या मांजरीचा 30 दिवसांचं क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर मांजरीला सोपण्याचा सल्ला दिला होता. पेटा इंडिया, ब्लू क्रॉस ऑफ इंडिया आणि द कॅटीट्युड ट्रस्ट यांनी या मांजरीची सुटका करावी यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून मागणी करत होते. हे वाचा - जिराफासारख्या दिसणाऱ्या प्राण्याच्या 'जंगल डेट'चा VIDEO व्हायरल पेटा इंडियाच्या रश्मी गोखलेंनी AQCS ला पत्रही लिहिल होतं, जोपर्यंत या मांजरीला कुणी दत्तक घेत नाही, तोपर्यंत आपण तिला पाळू असं त्यांनी या पत्रात म्हटलं. अनेक अभ्यासात दिसून आलं आहे, मांजरांना कोरोनाव्हायरसची लागण होऊ शकते आणि त्या एकमेकांना संक्रमित करू शकतात.मात्र याबाबत अपुरी माहिती उपलब्ध असल्यानं, लोकांमध्ये पाळीव प्राण्यांमार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका कमी असल्याचं सांगितलं जातं आहे. रश्मी गोखलेंनी चेन्नई कस्टम झोनला लिहिलेल्या पत्रात मांजरांमुळे माणसांना कोरोनाव्हायरसचा धोका नाही, असं नमूद केलं होतं. आता माणसांमुळे मुक्या जीवांचा जीव धोक्यात पाळीव प्राण्यांमार्फत माणसांमध्ये कोरोनाव्हायरस पसरतो, याचे पुरावे अद्याप सापडले नाहीत. मात्र माणसांमार्फत प्राण्यांमध्ये कोरोनाव्हायरस पसरत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हाँगकाँगमध्ये (hongkong) 2 कुत्र्यांना (dogs) कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे आणि हा व्हायरस माणसांमार्फतच त्यांच्यामध्ये आला असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. नेचर जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. या दोन्ही कुत्र्यांमधील व्हायरसचा जिनोम सिक्वेन्स मानवी शरीरातील व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्सप्रमाणेच आहे. याचा अर्थ माणसांमार्फत या कुत्र्यांमध्ये व्हायरस आला, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या