News18 Lokmat

मतदान ओळखपत्र नसलं तरीही तुम्ही करू शकता मतदान, फक्त 'या' गोष्टी सोबत ठेवा

तुमचं नाव मतदार यादीत असेल तर निवडणूक अधिकाऱ्यासमोर तुम्हाला तुमची ओळख सिद्ध करावी लागेल.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 02:28 PM IST

मतदान ओळखपत्र नसलं तरीही तुम्ही करू शकता मतदान, फक्त 'या' गोष्टी सोबत ठेवा

मुंबई, 08 एप्रिल : मतदान करण्याची तुमची तारीख आता जवळ यायला लागलीय. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाताना मतदान आयडी कार्ड आणि मतदान स्लिप घेऊन जाणं गरजेचं आहे. पण तुमच्याकडे मतदान आयडी कार्ड नसेल तरीही तुम्ही मत देऊ शकता. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असतं. पण तुमचं नाव मतदार यादीत असायला हवं.

तुमचं नाव मतदार यादीत असेल तर निवडणूक अधिकाऱ्यासमोर तुम्हाला तुमची ओळख सिद्ध करावी लागेल. त्या ओळखीला मान्यता मिळाली की तुम्ही तुमच्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करू शकता. त्यासाठी खालील आयडींची आवश्यकता आहे.


 1. पासपोर्ट

 2. ड्रायव्हिंग लायसेन्स

 3. Loading...

 4. केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकरीचं आयकार्ड

 5. आधार कार्ड

 6. बँक किंवा पोस्ट पासबुक

 7. रेसिस्टेंस जीन आइडेंटिफायर (RGI)नं दिलेलं स्मार्टकार्ड

 8. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियमचं कार्ड

 9. फोटो असलेले पेन्शन कागदपत्र

 10. कामगार मंत्रालयानं दिलेलं हेल्थ इन्शुरन्स कार्ड

 11. निवडणूक आयोगानं दिलेली फोटो मतदान स्लिप

 12. MLA, MP आणि MLCचं  ओळखपत्रही चालतं

 13. पण वीज बिल, रेशन कार्ड, घराची कागदपत्रं ओळखपत्र म्हणून चालणार नाही


तुमचं नाव मतदार यादीतून गायब झालं तर?

प्रत्येक मतदार केंद्रावर मतदारांच्या नावाची यादी लावली जाते. त्यात तुमचं नाव नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही.


कोण करू शकतं मतदान?

कुठल्याही नागरिकाला मतदानाची स्लिप मिळाली तर समजायचं त्याचं नाव मतदार यादीत आहे.

तुम्हाला स्लिप मिळाली नाही तर तुम्ही आॅनलाइन सर्च करू शकता. हेल्पलाइनच्या मदतीनं तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहू शकता.

एखाद्याकडे मतदान आयडी नसेल तर तुम्ही वरील कागदपत्रांपैकी एखादं डाॅक्युमेंट्स दाखवून मतदान करू शकता.VIDEO : उर्मिला मातोंडकर मोदी सरकारविरोधात आक्रमक, म्हणाल्या...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2019 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...