Elec-widget

नंबर प्लेटवर लिहिल्या जाती, पोलिसांनी जप्त केली 1 हजार 457 वाहनं

नंबर प्लेटवर लिहिल्या जाती, पोलिसांनी जप्त केली 1 हजार 457 वाहनं

जाते, जाते म्हणते पण नाही जात, असं उपरोधाने म्हटलं जातं. ही 'जात' नंबर प्लेटवरही लिहिली जाते. अशा जातीवाचक नंबर प्लेट लिहिणाऱ्यांवर नॉयडा पोलीस कारवाई करत आहेत.

  • Share this:

नॉयडा (उत्तर प्रदेश), 8 जुलै : जाते, जाते म्हणते पण नाही जात, असं उपरोधाने म्हटलं जातं. ही 'जात' नंबर प्लेटवरही लिहिली जाते. अशा जातीवाचक नंबर प्लेट लिहिणाऱ्यांवर नॉयडा पोलीस कारवाई करत आहेत.

वाहनांवर जप्तीची कारवाई

अशा वाहनांच्या नंबर प्लेटवर गुर्जर, ठाकुर, ब्राह्मण अशा जाती लिहिलेल्या आहेत. नॉयडा पोलिसांनी अशा जातीवाचक नंबर प्लेट असलेली 1 हजार 457 वाहनं जप्त केली.

पोलसांनी ऑपरेशन क्लीन - 7 अंतर्गत रविवारी नॉयडामध्ये शोधमोहीम राबवली. नॉयडा शहर आणि ग्रामीण भागातही ही पोलिसांनी ही कारवाई केली. अशा नंबर प्लेट असलेल्या वाहनांविरुद्ध ट्रॅफिक पोलिसांनीही आघाडी उघडली आहे.

फेसबुकवर राजकारणाचा 'चिखल', राणे आणि शिवसेनेमध्ये सोशल वॉर

बेकायदेशीर रिक्षांवरही कारवाई

याआधी ऑपरेशन क्लीन - 6 मध्ये पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई केली होती. ज्या वाहनचालकांकडे परमिट नाही अशी वाहनचालकांवरही कारवाईचा बडगा उगारला होता. नॉयडामध्ये सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. यामध्ये बेकायदेशीर रिक्षांवरही कारवाई केली जात आहे.

===========================================================================================

VIDEO : 'माझ्या मुलाला वाचवा', नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...