जगातील सर्वात धोकादायक पक्षाने केला हल्ला, एकाचा मृत्यू

ताशी पन्नास किलोमीटर वेगाने धावणारा हा कॅस्सोवरी शहामृग आणि इमूनंतर तिसरा सर्वात मोठा पक्षी आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 12:50 PM IST

जगातील सर्वात धोकादायक पक्षाने केला हल्ला, एकाचा मृत्यू

जगातील सर्वात मोठ्या आणि धोकादायक अशा पक्षाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेतील फ्लोरिडात घडली.

कॅस्सोवरी असं या पक्षाचं नाव असून त्याची उंची सहा फुटापर्यंत असते. या पक्षाच्या जवळ जाताच त्याने व्यक्तीवर हल्ला केला.

कॅस्सोवरी हा पक्षी इतका ताकदवर आहे की, तो पायाच्या सहाय्याने एकाच दणक्यात आपली शिकार करतो.

Loading...

या पक्षाचा धावण्याचा वेगही ताशी 50 किमी इतका आहे. जंगलातील उंच,सखल भागातून तो धावू शकतो. हा पक्षी शहामृग आणि इमू नंतर तिसरा सर्वात मोठा पक्षी आहे.

कॅस्सोवरीच्या पायाला चार नख्या असतात. या इतक्या मजबूत असतात की जमीन खोदण्यासाठी हे पक्षी त्यांचा वापर करतात. या पक्षाला जगातील सर्वात धोकादायक पक्षी म्हटलं जातं.

पक्षाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तो पक्षांना खाद्य देत असताना हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2019 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...