ATM सेंटरऐवजी किराणा दुकानातून काढता येणार पैसे, रिझर्व्ह बँकेचा नवा प्लॅन

जिथे ATM सेंटर्स कमी आहेत तिथे आपल्याजवळच्या किराणा दुकानातून तुम्ही पैसे काढू शकता. वाढत्या खर्चामुळे बँका ATM सेंटर्स बंद करत आहेत. त्यासाठी नंदन नीलकेणी यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने किराणा दुकानांचा पर्याय काढला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 04:51 PM IST

ATM सेंटरऐवजी किराणा दुकानातून काढता येणार पैसे, रिझर्व्ह बँकेचा नवा प्लॅन

नवी दिल्ली, 5 जून : तुमच्याकडे असलेल्या ATM कार्डमुळे तुम्हाला कधीही आणि कुठेही पैसे काढता येतात. पण देशभरात ATM सेंटर्सची संख्या घटल्यामुळे रिझर्व्ह बँकेने एक नवी योजना आणली आहे. यावर उपाय काढण्यासाठी या बँकेने एक समिती नेमली आहे.

जिथे ATM सेंटर्स कमी आहेत तिथे आपल्याजवळच्या किराणा दुकानातून तुम्ही पैसे काढू शकता. वाढत्या खर्चामुळे बँका ATM सेंटर्स बंद करत आहेत. त्यासाठी नंदन नीलकेणी यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीने किराणा दुकानांचा पर्याय काढला आहे.

कॅश इन कॅश आउट नेटवर्क

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कॅश इन कॅश आउट नेटवर्कच्या माध्यमातून OR कोड आणि आधार कार्डवर आधारित पेमेंट चॅनलचा वापर करून तुम्ही डिजिटल मनी ला कॅशमध्ये रूपांतरित करू शकता.

कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी दीपक शर्मा यांच्या मते, कॅश इन कॅश आउट सुविधेसाठी किराणा दुकानांमध्ये 3 कोटी POS यंत्रं लावावी लागतील. यासाठी स्थानिक किराणा दुकानदार आणि बिझनेस कॉरस्पॉंडंट्सची साखळी करावी लागेल.

Loading...

POS यंत्रांची मदत

गेल्या वर्षी 49 बँकांपैकी 30 बँकांनी आपल्या ATM सेंटर्सची संख्या कमी केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार देशातल्या सरकारी बँकांनी सुमारे 1 हजार ATM बंद केली आहेत. बँकांनी 6.4 लाख नवी POS यंत्रं वितरित केली आहेत. या पॉइंट ऑफ सेल यंत्रांच्या माध्यमातून किराणा दुकानात कार्ड स्वाइप करून आपण कॅश घेऊ शकतो.

ही योजना अमलात येण्यासाठी मोठं नेटवर्क तयार करावं लागणार आहे. त्याचबरोबर हे आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी मोठी खबरादारीही घ्यावी लागणार आहे.

=======================================================================================

'दबंग' सलमानची सटकली, बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 09:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...