...म्हणून एटीएम झाले कॅशलेस- अरुण जेटली

...म्हणून एटीएम झाले कॅशलेस- अरुण जेटली

देशातल्या अनेक राज्यांमध्ये एटीएममध्ये कॅशच नाहीये गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, तेलंगणा या राज्यांना सर्वाधिक फटका बसलाय. आणि सर्वात जास्त त्रास होतोय ते शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना.

  • Share this:

17 एप्रिल : काही राज्यात नकदीची मागणी वाढल्याने आणि योग्य वितरण न झाल्याने हा प्रकार झाल्याचं केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटलींनी सांगितलं . आता लवकरच यावर काहीतरी मार्ग काढला जाईल असं सांगण्यात येतं आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये एटीएममध्ये कॅशच नाहीये गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, तेलंगणा या राज्यांना सर्वाधिक फटका बसलाय. आणि सर्वात जास्त त्रास होतोय ते शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना. कारण त्यांना खरेदी-विक्री करायला कॅशची आवश्यकता असेत. पण रिझर्व बँकेनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही भागांमध्ये तर 8 ते 9 एटीएम फिरल्यावर कुठेतरी कॅश काढता येतेय.

पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात पैशांची चणचण निर्माण झाली होती. एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर रांग लावावी लागत होती. आता पुन्हा नोटाबंदीमध्ये जी परिस्थिती होती त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे. यावर केंद्र सरकारने आता सफाई दिली आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाना,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोकांनी गरजेपेक्षा जास्त रोकड काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बँकांचं म्हणणं आहे.

First published: April 17, 2018, 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading