News18 Lokmat

कॉफी विथ करण वाद: हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा

'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या टॉक शोमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या विरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2019 10:39 AM IST

कॉफी विथ करण वाद: हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या टॉक शोमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या विरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे या दोघांच्या अडचणीत भर पडली आहे.

कॉफी विथ करण-6 या कार्यक्रमात महिलांविषयी अपमानजनक विधान केल्यानंतर या दोघांवर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने बंदी घातली होती. पण त्यानंतर काही दिवसांनी ती उठवण्यात देखील आली होती. अर्थात हार्दिक आणि राहुल यांच्यावरील बंदी हटवण्यात आली असली तरी चौकशी सुरुच राहणार असल्याचे बीसीसीआयने तेव्हा स्पष्ट केले.

हार्दिक आणि राहुल यांच्या बरोबर करण जोहरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरमधील सरेचा गावातील देवाराम मेघवाल यांनी महिलांसंदर्भात अश्लील विधान करणे, आयटी अॅक्ट आणि एससी-एसटी अॅक्ट या कलमानुसार लूनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पांड्याने महापुरुषांचा अपमान केल्याचे मेघवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट आणि वाद

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खेळाडूंशी निगडीत अनेक वाद झाले आहेत. मात्र हार्दिक पांड्या आणि केएल राहुलचं हे प्रकरण गेल्या ८२ वर्षांत फक्त दुसरं आहे, जेव्हा भारतीय खेळाडूंना दौऱ्याच्यामध्येच स्वदेशात पाठवलं आहे. १९३६ मध्ये लाला अमरनाथ यांना तत्कालीन कर्णधार विज्जी यांनी एका प्रथम श्रेणी सामन्या दरम्यान अपमानजनक वागणुकीमुळे त्यांना इंग्लंड दौऱ्यातून निलंबीत करत भारतात पाठवण्यात आलं होतं.

Loading...

परदेशी दौऱ्यात आतापर्यंत अनेकदा शिस्तीचा विषय उभा राहीला आहे. मात्र भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा बीसीसीआयने कारवाई केली आहे. तसेच दोषी खेळाडूंना स्वदेशात जायला सांगितले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने जुलै २००७ मध्ये प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, अमरनाथ हे राजकारणाचे बळी ठरले होते. पांड्या आणि राहुलचं प्रकरण हे पूर्णपणे वेगळं आहे. त्यांना महिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिपणी केल्याची किंमत चुकवावी लागली.


VIDEO : डेकोरेशनसाठी लावले होते फुगे, झाला भयंकर स्फोट


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 09:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...