• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • केरळनंतर तमिळनाडूमध्ये निपाह व्हायरसचा शिरकाव, तापाच्या सर्व रुग्णांची होणार टेस्ट

केरळनंतर तमिळनाडूमध्ये निपाह व्हायरसचा शिरकाव, तापाच्या सर्व रुग्णांची होणार टेस्ट

केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरसमुळे (Nipah Virus) एका मुलाचा मृत्यू (Death) झाल्यानंतर आता तमिळनाडूमध्येदेखील (Tamilnadu) या व्हायरसचा रुग्ण (Patient) आढळून आला आहे.

 • Share this:
  तिरुवनंतपुरम, 6 सप्टेंबर : केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरसमुळे (Nipah Virus) एका मुलाचा मृत्यू (Death) झाल्यानंतर आता तमिळनाडूमध्येदेखील (Tamilnadu) या व्हायरसचा रुग्ण (Patient) आढळून आला आहे. त्यामुळे यंत्रणा सावध झाल्या असून केंद्र सरकारनं तातडीनं एक पथक केरळला पाठवलं आहे. दक्षिण भारतात निपाहचा शिरकाव व्हायला सुरुवात झाली असून सर्व संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तमिळनाडूच्या कोइमतूरमध्ये एका रुग्णाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचीं माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर सर्व रुग्णालयांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून जास्त ताप असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची निपाह चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जनावरांमध्ये असतो व्हायरस निपाह व्हायरस या मुख्यत्वे प्राण्यांमध्ये आढळून येतो. मात्र काही वेळा त्याची लागण मानवालाही होते. केरळमध्ये नुकताच एका 12 वर्षांच्या मुलाचा निपाहमुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाचा उद्रेक कमी होत नसताना निपाह व्हायरसच्या केसेस वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढचं आव्हान वाढू लागलं आहे. प्राण्यांपासून मानवाच्या शरीरात हा व्हायरस येण्याची शक्यता कमी असते. मात्र एका मानवापासून दुसऱ्या मानवात तो अधिक जलद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे निपाहची लागण झालेल्या रुग्णांना वेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. हे वाचा - OMG! असं कुठं असतंय व्हय? ही इमारत बघून व्हाल थक्क रामबुतान फळांचे नमुने प्राण्यांची चाखलेली रामबुतान फळं खाल्ल्यामुळे निपाह व्हायरसचा मानवी शरीरात प्रवेश होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन या फळांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. निपाहमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी केरळ सरकारने तयार केली असून एकूण 251 लोक त्याच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे. यातील अधिकाधिक लोकांपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्याचा प्रयत्न करत असून त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येत आहेत.
  Published by:desk news
  First published: