टोलनाक्यावर पैशावरून राडा, गोळीबारानंतर भाजप नेत्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा

टोलनाक्यावर पैशावरून राडा, गोळीबारानंतर भाजप नेत्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालत राडा करणं भाजप नेत्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

  • Share this:

आग्रा, 7 जुलै : टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालत राडा करणं इटावा येथील भाजपचे माजी खासदार रामशंकर कथेरिया यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कारण याप्रकरणी पोलिसांनी रामशंकर कथेरिया आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात दंगल, दुखापत करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

आग्रा इथल्या टोलनाक्यावरून भाजप नेते रामशंकर कथेरिया यांचा ताफा जात असताना पैसे देण्यावरून त्यांचा तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती टोलनाका कर्मचाऱ्याला कानाखाली मारताना दिसत आहे. तसंच तिथं हवेत गोळीबारही करण्यात आला.

या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी कथेरिया आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टोलनाका कर्मचाऱ्याला कानाखाली मारणारा आणि हवेत गोळीबार करणारा व्यक्ती नक्की कोण होता, याबाबत तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे.

'आमच्यावरच आधी हल्ला झाला'

माझ्या ताफ्यातील कोणत्याही व्यक्तीने टोलनाक्यावरील व्यक्तीला मारहाण केलेली नाही. उलट त्याच कर्मचाऱ्यांनी आमच्यावर हात उचलला असा दावा रामशंकर कथेरिया यांनी केला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तुकोबांच्या पालखींचं तिसरं गोल रिंगण, पाहा EXCLUSIVE व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: agraBJP
First Published: Jul 7, 2019 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading