मराठी बातम्या /बातम्या /देश /2014 मध्ये खरेदी केली कार अन् 2023 मध्ये समोर आलं असं सत्य की...

2014 मध्ये खरेदी केली कार अन् 2023 मध्ये समोर आलं असं सत्य की...

car Fraud

car Fraud

बस्ती येथे 8 वर्षांपूर्वी एका व्यक्तीनं कार खरेदी केली. आरटीओकडे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कारला नंबरप्लेटही लावण्यात आली. त्यानंतर आठ वर्षं ही कार रस्त्यावर धावत राहिली.

  • Local18
  • Last Updated :
  • New Delhi, India

    एखाद्यानं नवीन गाडी घेतल्यानंतर नियमानुसार गाडीचं आरटीओकडे रजिस्ट्रेशन केलं; मात्र त्याला रजिस्ट्रेशनची बनावट कागदपत्रं आणि खोटा गाडी क्रमांक दिला गेला आणि ही गोष्ट अनेक वर्षं गाडीच्या मालकालाच काय, पण वाहतूक पोलिस, आरटीओ अधिकारी यांनादेखील समजली नाही. असा प्रकार तुम्ही कधी ऐकला आहे का? तुमचा विश्वास बसणार नाही; मात्र प्रत्यक्षात असा प्रकार उत्तर प्रदेशात बस्ती इथे घडलाय.

    बस्ती येथे 8 वर्षांपूर्वी एका व्यक्तीनं कार खरेदी केली. आरटीओकडे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कारला नंबरप्लेटही लावण्यात आली. त्यानंतर आठ वर्षं ही कार रस्त्यावर धावत राहिली. तिचा विमाही काढला गेला. तो रिन्यू होत राहिला: पण सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे या गाडीचा नंबर व कागदपत्रं बनावट होती. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिस, आरटीओसह कोणत्याही अधिकाऱ्याला याबाबत सुगावा लागला नाही. जेव्हा कार मालकाला त्याच्या कारची कागदपत्रं व नंबर बनावट असल्याचं समजलं, तेव्हा त्याने ही कार ज्या शोरूममध्ये घेतली होती, त्या शोरूमच्या मालकासह तत्कालीन सहायक आरटीओ शंकर सिंह आणि इतर दोषींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.

    जगातल्या सर्वांत महाग द्राक्षांची किंमत ऐकून धक्का बसेल; त्या पैशात एक टू व्हिलर घ्याल

    फसवणुकीचा प्रकार असा आला समोर

    कारचे मालक मनीष मिश्रा यांनी सांगितलं की, ‘सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा मी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात पोहोचलो, तेव्हा मला कळलं की माझ्या कारचं रजिस्ट्रेशन बनावट आहे. मी कारच्या नंबरप्लेटवर टाकलेला नंबर व त्यासंबंधीची कागदपत्रं बनावट असल्याचं मला सांगण्यात आलं. हे ऐकून मला धक्काच बसला आणि मी संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा मला कळलं, की मी 2014मध्ये गोरखपूरच्या ज्या शोरूममधून कार खरेदी केली होती, तिथे कारसाठी मी नोंदणी शुल्क जमा केलं होतं. मला त्याच कारसाठी बनावट रजिस्ट्रेशन पेपर देण्यात आला होता आणि त्या बनावट पेपरनुसार माझ्या कारचा क्रमांक UP 51 AA 6262 आहे. तेव्हापासून मी संबंधित कार चालवणं बंद केले असून ती माझ्या घरासमोर उभी आहे. पण ही गाडी मी माझ्या कष्टाच्या पैशातून विकत घेतली होती. त्यामुळे यासंपूर्ण फसवणुकीच्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी मी तक्रार दिली आहे.’

    जिवंत सापाला गळ्यात गुंडाळून अगदी स्टाईलमध्ये काढला Selfie; पण पुढच्याच क्षणी...

    पोलिसांनी घेतली दखल

    या प्रकरणाची बस्ती इथले अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपेंद्र चौधरी यांनी दखल घेतली आहे. ते म्हणाले की, ‘या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सुरू असून लवकरच आरोपींवर कारवाई केली जाईल. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणं, हे गुन्हेगारी कृत्य आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे एकाच क्रमांकाची दोन वाहनं धावत असतील तर सुरक्षा व्यवस्थेलाही धोका आहे.’

    First published:

    Tags: Car