मराठी बातम्या /बातम्या /देश /

बेशुद्ध माकडासाठी कारचालक बनला देवदूत, तोंडाने श्वास देत वाचवला जीव, VIDEO पाहून येईल गहिवर

बेशुद्ध माकडासाठी कारचालक बनला देवदूत, तोंडाने श्वास देत वाचवला जीव, VIDEO पाहून येईल गहिवर

बेशुद्ध पडलेल्या माकडाला तोंडाने श्वास देऊन त्याचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बेशुद्ध पडलेल्या माकडाला तोंडाने श्वास देऊन त्याचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बेशुद्ध पडलेल्या माकडाला तोंडाने श्वास देऊन त्याचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • Published by:  desk news

चेन्नई, 13 डिसेंबर: बेशुद्ध पडलेल्या (Unconscious monkey) माकडाला तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास (Mouth to mouth resuscitation) देत एका कार चालकाने त्याचे (Saved life) प्राण वाचवले आहेत. या कारचालकावर सध्या कौतुकाचा (Hailed as hero) वर्षाव होत असून हाच खरा हिरो असल्याची भावना समाजातून आणि समाजमाध्यमातून व्यक्त होत आहे. झाडावर अडकलेल्या माकडाच्या पिल्लाची सुटका करून त्याचे प्राण वाचवण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

अशी घडली घटना

तमिळनाडूतील पेरंबलूर परिसरात कारचालक म्हणून काम करणाऱ्या एम. प्रभू यांना झाडावर एक माकड बेशुद्धावस्थेत पडल्याचं दिसतं. काही भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्यात ते गंभीर जखमी झालं होतं. त्याला मदत करण्याचा निर्णय़ प्रभू यांनी घेतला आणि त्याला झाडावरून खाली उतरवण्यासाठी ते झाडावर चढले. झाडावरून त्याला अलगद खाली उतरवलं आणि प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जाऊ लागले.

माकडाची बिघडली तब्येत

मित्राच्या दुचाकीवरून माकडाला घेऊन जात असताना माकडाच्या पिल्लाच्या हृदयाचे ठोके कमी होत झाल्याचं त्यांना जाणवलं. अचेतन अवस्थेत पडलेल्या त्या माकडाच्या जिवाला धोका असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गाडी थांबवली. काही महिन्यांपूर्वी प्रथमोपचाराचं घेतलेलं प्रशिक्षण त्यांना आठवलं आणि त्याचा उपयोग करण्याचा निर्णय़ त्यांनी घेतला.

माकडाला दिला कृत्रिम श्वास

माकडाच्या छातीवर जोर देऊन त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न प्रभू यांनी सुरु केला. अनेकदा त्याच्या छातीवर हलका दाब दिल्यानंतरही माकड प्रतिसाद देत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी माकडाला उचलून घेतलं आणि स्वतःच्या तोंडातून त्याच्या तोंडात हवा फुंकत त्याला श्वास देण्याचा प्रयत्न केला. दोनदा असा प्रयत्न केल्यानंतर माकडावर परिणाम झाला आणि माकडाने प्रतिसाद दिला.

झाला अत्यानंद

आपल्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाल्याचं पाहिल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला की चित्कार करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मरणासन्न अवस्थेत पडलेल्या माकडाला जीवदान देण्याचं मोठं काम प्रभू यांनी केलं.

हे वाचा - कुत्र्याला घाबरून खांबावर चढलं मांजराचं पिल्लू, पुढे काय झालं? पाहा VIDEO

राज्यभरात कौतुक

एम.प्रभु यांनी केलेलं काम हे एखाद्या देवदूताचं काम असल्याची भावना नेटिझन्स व्यक्त करत आहेत. ज्यांनी देव पाहिला नसेल, त्यांनी प्रभूंकडे पाहावं. त्याचं नाव आणि काम दोन्हीमध्ये प्रभू असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: Tamil nadu, Wild life