Home /News /national /

भरधाव बस आणि कारची जोरदार धडक; अपघातानंतर बसने घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू, LIVE VIDEO आला समोर

भरधाव बस आणि कारची जोरदार धडक; अपघातानंतर बसने घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू, LIVE VIDEO आला समोर

Car and Bus collide : भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बसने पेट घेतला.

    झारखंड, 15 सप्टेंबर : एका भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. झारखंडमधील रामगड येथे हा अपघात (Accident in Ramgarh Jharkhand) झाला आहे. भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक (Car and Bus collide) झाली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर तात्काळ बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. Kasab ने ट्रेनिंग घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच Dawood च्या हस्तकांनी घेतलेली ट्रेनिंग, तपासात माहिती उघड मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वच पाचही जण हे बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भररस्त्यात बस आणि कारने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र, अपघात झालेली कार ही बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, Jharkhand

    पुढील बातम्या