गोरखपूर, 20 ऑगस्ट: उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं भरधाव कारच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले. चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं त्यानं रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात रस्त्यावरून जाणारे व्यक्ती गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं. हा चालक दारू पिऊन गाडी चालवत होता का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.