भरधाव BMW कारनं तीन जणांना फरफटत नेलं, अंगावर शहारे आणणारा थरारक VIDEO

भरधाव BMW कारनं तीन जणांना फरफटत नेलं, अंगावर शहारे आणणारा थरारक VIDEO

आयस्क्रीम खात असताना अचानक एक्सलेटर दाबला आणि तीन लोकांना जोरात धडक दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : दिल्लीमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. फॅशन डिझायनर असलेल्या तरुणीनं आपल्या BMW कारनं आयस्क्रीम वेंडरसह दोन जणांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव कारनं तीन जणांना फरफट नेल्याची आणि चिडल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

ही घटना शुक्रवारी दिल्लीतील अमर कॉलोनी इथे घडली आहे. आयस्क्रीम खात असलेल्या दोन जणांसह वेंडरलाही भरधाव कारनं चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कार चालवणारी तरुणी फॅशन डिझायनर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तरुणीला अटक केली आहे.

हे वाचा-कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका? वैज्ञानिकांचा खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी आयस्क्रीम घेऊन कारमध्ये बसली. आयस्क्रीम खात असताना अचानक एक्सलेटर दाबला आणि तीन लोकांना जोरात धडक दिली. घटनेनंतर तरुणीनं पळ काढला. पण तिथे असलेल्या पोलिसांनी या तरुणीला अडवलं आणि ताब्यात घेतलं.

ही तरुणी फॅशन डिझायनर आहे. शुक्रवारी गाडीत आयस्क्रीम खात असताना अचानक अॅक्सलेटर दाबला गेल्यानं हा अपघात झाला. या प्रकऱणी तरुणीला अटक केली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 2, 2020, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading