मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला कारनं चिरडलं, पाहा अपघाताचा थरारक VIDEO

मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला कारनं चिरडलं, पाहा अपघाताचा थरारक VIDEO

सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञाताचा शोध सुरू, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • Share this:

लखनऊ, 09 मार्च: व्यायाम व्हावा आणि तंदुरुस्त शरीर राहावं म्हणून मॉर्निंग वॉक करत असणाऱ्या तरुणाला भरधाव गाडीनं धडक देत चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा तरुण मॉर्निंग वॉक करत होता त्याचवेळी मागून येत असलेल्या भरधाव गाडीनं या तरुणाला चिरडत काही फूट लांब नेल. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तरुणाच्या या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मॉर्निंग वॉक करत असताना विरुद्ध दिशेनं येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीनं धडक दिली आणि दुर्घटना घडली. या अपघातात 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

हे वाचा-कार आणि मोटरसायकलची धूम स्टाईल रेसिंग ठरली जीवघेणी, गोव्यात 3 मुलांचा मृत्यू

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की 21 वर्षांचा तरुण मॉर्निंग वॉक करत आहे आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या या गाडीनं जोरदार धडक दिली. या धडकेनंतरही या गाडीनं काही अंतर तरुणाला चिरडत नेलं. या दुर्घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे तरुणाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना 7 मार्च रोजी सकाळी घडल्याचं सांगितलं जात आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय पार्क इथे हा अपघात झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-Tik Tokवर फेमस होण्यासाठी सापासोबत केला डान्स नंतर जिवंत जाळलं

First published: March 9, 2020, 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading