नवी दिल्ली, 18 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आवाहन केल्यानंतर कँटिन स्टोअर्स डिपार्टमेंट (Canteen Stores Department) ने दारूचे खूप प्रसिद्ध असणारे दोन ब्रँडची ऑर्डर घेतली नाही आहे. मीडिया अहवालाच्या मते नवीन ऑर्डर न घेतल्यामुळे सेना अधिकाऱ्यांना त्यांचे हे आवडीचे बँड मिळणार नाही आहेत. असे असले तरी अद्याप सीएसडीकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पेरनॉर्ड रिकार्ड (Pernod Recard) आणि डियाजियो (Diageo) ची आयात थांबवण्यात आली आहे.
50 टक्के आयात केल्या जाणाऱ्या दारूचा आर्मी कँटिनमध्ये होतो पुरवठा
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका बातमीनुसार एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे हा मुद्दा अद्याप विचाराधीन आहे. अंतिम निर्णय सरकारद्वारे घेण्यात येईल. त्यांनी असे सांगितले की हे प्रकरण केवळ आयात केल्या जाणाऱ्या दारूबाबत नाही आहे, तर लॉकडाऊन काळात केवळ आवश्यक सामानाची खरेदी केली जाईल असे आदेश विभागाकडून देण्यात आले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, आयात केल्या जाणाऱ्या दारूवर निर्बंध लादल्याने व्यापारावर फारसा फरक पडणार नाही, यामध्ये या दारूचा हिस्सा खूप लहान आहे.
वाचा-चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग
फ्रेंच कंपनी पेरनॉड रिकार्ड आणि युकेची कंपनी डियाजिओ या दोघांचाही मिळून 50 टक्के हिस्सा आर्मी कँटिनला पुरवण्यात येतो. सीएसडी भारतामध्ये जवळपास 5000 स्टोअर चालवते, ज्यामधून वर्षभरात दारूच्या एकूण 11 मिलियन केस विकल्या जातात. यामध्ये जवळपास अर्धी रम असते. तर 1 ते 1.2 लाख केस इम्पोर्टेड दारू असते. एका केसमध्ये जवळपास 9 लीटर दारू किंवा 750 ml च्या 12 बाटल्या असता.
या कँटिनमध्ये दारू डिस्काउंटमध्ये विकली जाते. तसंच सामान्य दुकानांपेक्षा याचे रजिस्ट्रेशन देखील वेगळ्या पद्धतीने होते.
वाचा-भारत चीन : दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची संघर्षानंतर प्रथमच फोनवर चर्चा
संपादन-जान्हवी भाटकर.