मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘स्त्री-पुरुष बंद खोलीत एकत्र असल्यास अनैतिक संबंध समजणे चुकीचे’ हायकोर्टाचा निर्णय

‘स्त्री-पुरुष बंद खोलीत एकत्र असल्यास अनैतिक संबंध समजणे चुकीचे’ हायकोर्टाचा निर्णय

एक पुरुष आणि एक महिला बंद खोलीत एकत्र आढळले तर त्यांच्या अनैतिक संबंध (Immoral relationship) आहेत, ही समजूत चुकीची आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मद्रास हायकोर्टनं (Madras Highcourt) सुनावला आहे.

  • Published by:  News18 Desk

मद्रास, 04 फेब्रुवारी :  स्त्री- पुरुष यांच्या नात्यामधील चुकीच्या समजुतींना तडा देणारा एका निर्णय हायकोर्टानं नुकताच दिला आहे. एक पुरुष आणि एक महिला बंद खोलीत एकत्र आढळले तर त्यांच्या अनैतिक संबंध (Immoral relationship) आहेत, ही समजूत चुकीची आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मद्रास हायकोर्टानं (Madras Highcourt) दिला आहे.

काय आहे निकाल?

‘टाईम्स ऑफ इंडिया’ मधील वृत्तानुसार, सशस्त्र रिझर्व्ह पोलीस दलातील एका कॉन्सटेबलच्या प्रकरणाची सुनावणी करताना हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे. सरवण बाबू असं त्यांचं नाव आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. ‘या पद्धतीचा निष्कर्ष काढून एखाद्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करता येत नाही, किंवा त्याला शिक्षा दिली जाऊ शकत नाही,’ असं मत या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश आर. सुरेशकुमार यांनी व्यक्त केलं आहे. सरवण बाबू यांच्या बडतर्फीची याचिका देखील त्यांनी फेटाळून लावली आहे.

काय आहे प्रकरण?

कॉन्स्टेबल सरवण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘1998 साली एक महिला कॉन्स्टेबल त्यांच्या घराची किल्ली शोधण्यासाठी सरवण यांच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे शेजारी घरी आले तेंव्हा सरवण यांच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना आला. सरवण यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. कुणीतरी आधी दरवाजा लावला आणि नंतर दार वाजवण्याचं नाटक केलं, असा दावा सरवण यांनी केला होता.

मद्रास हायकोर्टानं सरवण यांचा हा दावा ग्राह्य धरला आहे. या प्रकरणातील आरोपीचे अनैतिक संबंध असल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Court, Crime, Relationships