देशात फूट पाडण्याचा प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप

देशात फूट पाडण्याचा प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप

'CAAमुळे कुठल्याही धर्माच्या भारतीयांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. या नव्या कायद्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या लोकांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 16 डिसेंबर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून Citizenship Amendment Act (CAA) देशभर हिंसाचार सुरू आहे. पूर्वोत्तरेतल्या राज्यांनंतर आता हे लोन दिल्लीतही आलं असून विद्यार्थ्यांचा भडका उडालाय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलंय. रविवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. CAAमुळे कुठल्याही धर्माच्या भारतीयांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. या नव्या कायद्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या लोकांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वीकारणं ही आपल्या प्राचीन परंपरेची शिकवण आहे. त्याचाच अवलंब करण्यात आला आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा आणि चुकीचं माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

'जामियात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू ही निव्वळ अफवा', कुलगुरुंची पत्रकार परिषद

पंतप्रधान मोदींनी आज एकापाठोपाठ चार ट्वीट करत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सगळं काही स्पष्ट असताना सरकार काही लोक जाणीवपूर्वक समाजात आणि देशात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. देशातल्या बहुतांश पक्ष आणि खासदारांनी या कायद्याचं समर्थन केलंय. त्यामुळे कुठल्याही अफवांना आणि खोट्या माहितीला बळी पडू नका आणि शांततेच्या मार्गानेच आंदोन करा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलंय.

सुप्रीम कोर्टाने फटकारलं

जामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायायलयात तात्काळ सुनावणीची मागणी करण्यात आली होती. वकील इंदिला जयसिंग यांनी देशात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी करू असं म्हटलं पण आधी हिंसाचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीशांनी म्हटले की, शांततेनं विरोध करणाऱ्यांविरुद्ध आम्ही नाही आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी आमची जबाबदारी माहिती आहे.

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

सरन्यायाधीशांच्या पीठाने याचिकाकर्त्याने पोलिसांकडून झालेल्या हिंसाचाराचा व्हिडिओही असल्याचं म्हटलं. यावर सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारत हे न्यायालय आहे या ठिकाणी तुमचं म्हणणं शांतपणे मांडावं लागेल. या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होईल पण त्याआधी हिंसाचार थांबला पाहिजे असं म्हटलं.

हिंसाचाराच्या घटनांवर नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश म्हणाले की, तुमच्याकडे यावर काही मार्ग आहे म्हणून तुम्हा आला असाल तर शांतपणे तुमचं म्हणणं मांडायला हवं. जर आंदोलक म्हणून तुम्ही राहणार असाल तर तेच करा. आम्ही अधिकारांचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे. पण हे गोंधळाच्या वातावरणात होऊ शकतं नाही. पहिल्यांदा हे सर्व थांबवा त्यानंतर आम्ही स्वत: याबाबत पाऊले उचलू असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 16, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading