Home /News /national /

ऐटीत लढवली सरपंचपदाची निवडणूक, मात्र निकालानंतर बसला धक्का; ऐनवेळी कुटुंबानेही सोडली साथ

ऐटीत लढवली सरपंचपदाची निवडणूक, मात्र निकालानंतर बसला धक्का; ऐनवेळी कुटुंबानेही सोडली साथ

ग्रामपंचायत निवडणुकीत एक विचित्र प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका उमेदवाराला केवळ एक मत पडलं (got only one vote) आहे.

    वापी, 22 डिसेंबर: ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून गावचा सरपंच बनण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे प्रयत्न करतात पण त्यांना गावचा सरपंच काही बनता येत नाही. असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका उमेदवाराला केवळ एक मत पडलं (got only one vote) आहे. ग्रामपंचायतीचा निकाल समोर येताच गावात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संबंधित उमेदवाराच्या घरात एकूण 12 सदस्य होते. असं असूनही त्यांना केवळ एकच मत मिळालं आहे. त्यामुळे या उमेदवाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित प्रकरण गुजरातमधील (Gujrat) वापी जिल्ह्यातील छारावाळा गावातील आहे. तर संतोष हलपती असं संबंधित उमेदवाराचं नाव आहे. मंगळवारी मतमोजणी केंद्रावर निकाल लागताच, केवळ एकच मत मिळालेलं पाहून हलपती हैराण झाले (Candidate shocked after election result) आहेत. त्यांच्या घरात पत्नीसह एकूण 12 सदस्य आहेत. हेही वाचा- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड, सोनिया गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन असं असूनही हलपती यांना केवळ एकच मत मिळालं आहे. घरातील लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही. त्यामुळे त्यांना अतिशय दु:ख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. किमान त्यांच्या पत्नीसह त्यांचे कुटुंबीय त्यांना मतदान करतील, अशी अपेक्षा त्यांना होती. पण घरातील एकाही सदस्याने त्यांना मतदान केलं नाही. हे पाहून त्यांना वाईट वाटलं. हेही वाचा- लव्ह जिहादविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा; 30 हजार दंडासह इतक्या वर्षांचा तुरुंगवास पण स्थानिक निवडणुकांमधील इतर निकालांवर ते नाराज नसल्याचं हलपती यांनी बोलून दाखवलं आहे. खरंतर दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील 8,686 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. यातील 6,481 ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी रात्रीपर्यंत जाहीर करण्यात आले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Election, Gujrat

    पुढील बातम्या