मुंबई, 30 ऑगस्ट : मोदी सरकार सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्यमान भारत या योजनेतून सर्वसामान्यांना मोठी भेट देऊ शकते. पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत लवकरच कॅन्सरच्या उपचारावर आणि गुडघ्यावरील सर्जरी करता येईल. सध्या या योजनेतून मिळणारी मोतीबिंदूची सुविधा बंद होऊ शकते. या योजनेतून 1300 पेक्षा जास्त आजारांवर उपचार मोफत केला जातो.
इकॉनॉमिक्स टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, नॅशनल हेल्थ अॅथॉरिटीनं आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या 1300 आजारांबाबत समीक्षेसाठी नीति आयोगाचे सदस्य प्राध्यापक विनोद के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं त्यांचा अंतिम अहवाल तयार केला आहे.
समितीच्या शिफारसीनुसार, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत कॅन्सर आणि प्रत्यारोपण सर्जरीच्या सुविधा लोकांना देता येतील. समितीने उपचारांसाठी रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या फीबाबतही बदल सुचवले आहेत. अहवालानुसार 200 आजारांवरील उपचार खर्च वाढला तर 63 आजारांवरील उपचार खर्च कमी करण्यात आला आहे.
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे पाहा. यात तुमचे नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://www.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. इथं मोबाइल नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी जनरेट होईल तो अॅड केल्यानंतर राज्य सिलेक्ट करा. यामध्ये तुमचे नाव सर्च केल्यावर इतर माहिती भरा आणि शोधा. यासाठी आयुष्यमान भारत योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी 14555 किंवा 1800 111 565 वर कॉल करू शकता.
योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड लागतं. ते रुग्णालयात आणि कॉमन सर्विस सेंटरमध्ये मिळतं. देशातील ग्रामीण भागाता कॉमन सर्विस सेंटर तयार करण्यात आले आहेत. जिथं कार्ड तयार करण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी कार्ड घेण्यासाठी 30 रुपये आकारले जातात तर रुग्णालयात हेच कार्ड मोफत मिळेल.
हार्दिक पांड्याचं लवकरच शुभमंगल सावधान? 'या' अभिनेत्रीनं केलं क्लीन-बोल्ड