Home /News /national /

मोठी बातमी! या राज्यात 1 ली ते 8 वीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द; असा मिळणार पुढील वर्गात प्रवेश

मोठी बातमी! या राज्यात 1 ली ते 8 वीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द; असा मिळणार पुढील वर्गात प्रवेश

शाळांचे सॅनिटायजेशन बंधनकारक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळांचं सॅनिटायजेशन बंधनकारक करण्यात आलं आहे.

शाळांचे सॅनिटायजेशन बंधनकारक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळांचं सॅनिटायजेशन बंधनकारक करण्यात आलं आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठी ही दिलासादायक बाब आहे

    नवी दिल्ली, 9 डिसेंबर : पश्चिम बंगाल (West bangal) सरकारनंतर आता मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारनेही शालेय मुलांसाठी (School Students) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न घेता (No Exam) पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रोजेक्टच्या आधारावर केले जाईल. याशिवाय यावर्षी 5 वी व 8 वीच्या बोर्डाच्या परीक्षादेखील होणार नाहीत. 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहणार मध्य प्रदेश सरकारने यापूर्वीच 1 ली ते 8 वीपर्यंतचे वर्ग 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता शालेय शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) इंद्रसिंह परमार यांनी राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती समोर आली आहे. प्रोजेक्ट मूल्यांकनाच्या आधारे क्लासला प्रवेश देण्यात येईल. हे ही वाचा-शेतकरी आंदोलनास मोदी सरकारच जबाबदार, भाजपच्या माजी मंत्र्यांची टीका यावर्षी पाचवी व आठवीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत, तर दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच वर्ग सुरू होतील, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. इयत्ता 9 आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शाळेत बोलावले जाऊ शकते. यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारनेही कोणतीही परीक्षा न घेता राज्यातील सर्व शाळांमधील सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक (Maharashtra Education) संस्थेतील काही जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक (Students and Teachers) संक्रमित (Covid-19) झाले नाही ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या