'जातींच्या नावाने असलेल्या रेजिमेंट रद्द करा', दलित नेत्याचं मोदींना पत्र

'जातींच्या नावाने असलेल्या रेजिमेंट रद्द करा', दलित नेत्याचं मोदींना पत्र

भारतीय लष्करामध्ये जाट, रजपूत, गोरखा, शीख अशा रेजिमेंट्स म्हणजे तुकड्या आहेत. डोगरा, पंजाब, बिहार आणि आसाम रेजिमेंट्सचाही यात समावेश आहे. पण अशा प्रकारे जातीच्या नावाने असलेल्या रेजिमेंट्स रद्द करा, अशी मागणी आता होते आहे.

  • Share this:

लखनौ, 24 जून : भारतीय लष्करामध्ये जाट, रजपूत, गोरखा, शीख अशा रेजिमेंट्स म्हणजे तुकड्या आहेत. डोगरा, पंजाब, बिहार आणि आसाम रेजिमेंट्सचाही यात समावेश आहे. पण अशा प्रकारे जातीच्या नावाने असलेल्या रेजिमेंट्स रद्द करा, अशी मागणी आता होते आहे.

आरटीआय कार्यकर्ते आणि दलित नेते ओ. पी. धामा यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांत लष्करामध्ये अहिर रेजिमेंट असावी, अशी मागणी होत होती. अशाच पद्धतीने बाकीच्या काही संस्थाही मागणी करू शकतात. पण हे राष्ट्रहिताचं नाही, असं धामा यांनी म्हटलं आहे.

चांभार रेजिमेंटची मागणी

समाजवादी पक्षाचे नेत अखिलेश यादव यांनी अहीर बख्तरबंद रेजिमेंट करण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर भीम आर्मीचा नेते चंद्रशेखर यांनी चांभार रेजिमेंट काढण्याची मागणी केली होती.

विश्वास नांगरे पाटील म्हणतात, 'मीच सोशल मीडियाचा पीडित'

चांभार रेजिमेंटचा हा मुद्दा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोरही ठेवण्यात आला होता. पण आता अशा प्रकारे जातीच्या नावावर रेजिमेंटच्या मुद्द्याला विरोध होतो आहे.

शहिदांच्या नावावर रेजिमेंट

देशात जातिवादाचं उच्चाटन करायचं असेल तर शहिदांच्या नावांनी रेजिमेंट बनवल्या जाव्या, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते ओ. पी. धामा यांनी केली आहे.लष्कराप्रमाणे हवाई दल आणि नौदलात अशा रेजिमेंट्स नाहीत. धामा यांनी मिळवलेल्या माहितीवरून हेही लक्षात आलं की लष्करात 23 रेजिमेंट्स आहेत. त्यातल्या बऱ्याचशा जातीवर आधारित आहेत. त्यामुळेच या रेजिमेंट रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. ओ. पी. धामा हे डॉ. बी. आर. आंबेडकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत.

=============================================================================

...आणि संभाजीराजेंना अश्रू अनावर झाले, पाहा VIDEO

First published: June 24, 2019, 7:33 PM IST

ताज्या बातम्या