News18 Lokmat

सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर!

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून कॅनडाने पहिला नंबर पटकावला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2018 09:42 AM IST

सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर!

26 एप्रिल : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून कॅनडाने पहिला नंबर पटकावला आहे. 'IPSOS MORI' द्वारे सहिष्णू देशांचा सर्व्हे करण्यात आला. यावेळी जगातील २७ देशांतील एकूण २० हजार लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

समाजात दरी निर्माण करणाऱ्या तथ्यांना प्रकाशात आणण्याचा या मुलाखतीतून प्रयत्न करण्यात आला आहे. सहिष्णू देशांच्या या यादीत कॅनडाने प्रथम स्थान पटकावलं असून चीन आणि मलेशियाने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले आहे.

यात भारताला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. वेगवेगळे बॅकग्राऊंडस, संस्कृती आणि दृष्टिकोण असणाऱ्या ६३ टक्के लोकांनी भारत सहिष्णू असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...