Home /News /national /

चिंताजनक! कोरोनप्रमाणेच monkeypox ही घेणार महामारीचं रूप? WHO ने दिलं उत्तर

चिंताजनक! कोरोनप्रमाणेच monkeypox ही घेणार महामारीचं रूप? WHO ने दिलं उत्तर

मंकीपॉक्सवर आयोजित एका चर्चासत्रात डॉ. रोजमंड म्हणाले की, यावर विशेष जोर द्यावा लागेल की बहुतेक देशांमध्ये जी प्रकरणं समोर येत आहेत ती सहसा समलिंगी, उभयलिंगी, पुरुष आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे लोक यांच्यातच आढळत आहेत.

    नवी दिल्ली 31 मे : युरोपातील 15 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची शंभरहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. हे पाहता मंकीपॉक्स (Monkeypox Cases) सुद्धा कोरोनाप्रमाणे (Coronavirus) महामारीचं रूप घेईल की काय अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मंकीपॉक्स तज्ज्ञ डॉ. रोजमंड लुईस यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्सचा आजार महामारीचं रूप घेईल, असं त्यांना वाटत नाही, परंतु शास्त्रज्ञांना अद्याप मंकीपॉक्सबद्दल फारशी माहिती नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. Monkeypox Virus : सेक्समुळे जलद पसरला मंकीपॉक्स व्हायरस, WHO ने काय इशारा दिला? ते म्हणाले की हा व्हायरस लोकांमध्ये नेमका कसा पसरतोय हे आतापर्यंत आम्हाला माहिती नाही. डॉ. रोजमंड लुईस म्हणाले की, हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे की स्मॉलपॉक्ससाठी लसीकरण मोहीम अनेक दशकांपूर्वी सुरू करण्यात आली होती, परंतु ती गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. लसीकरण बंद केल्यामुळे आता हा आजार पसरत आहे का? असा प्रश्नही आहेच. मंकीपॉक्सवर आयोजित एका चर्चासत्रात डॉ. रोजमंड म्हणाले की, यावर विशेष जोर द्यावा लागेल की बहुतेक देशांमध्ये जी प्रकरणं समोर येत आहेत ती सहसा समलिंगी, उभयलिंगी, पुरुष आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे लोक यांच्यातच आढळत आहेत. हे कशामुळं होत आहे याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणाले की याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण याआधी अशी प्रकरणं आढळली नव्हती ज्यात समलिंगी किंवा उभयलिंगींना हा आजार झाला आहे. Monkeypox म्यूटेशनचा धोका किती, लक्षण दिसल्यावर काय करावं? कसा होतो संसर्ग, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हा आजार केवळ समलिंगी किंवा उभयलिंगींमध्येच होतो, असं नाही, असा इशाराही डॉ. रोजमंड यांनी दिला. प्रत्येकाला हा आजार होऊ शकतो. दुसऱ्या एका तज्ज्ञाने सांगितलं की, हा निव्वळ योगायोग असू शकतो की हा आजार पहिल्यांदा गे आणि बायसेक्शुअलमध्ये दिसला. पण लवकरच त्याचा संसर्ग इतर लोकांनाही होऊ लागला. जर त्यावर नियंत्रण मिळवलं नाही तर तो कोणत्याही माणसामध्ये पसरू शकतो. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, 23 देशांमध्ये या आजाराचं एकही प्रकरण नव्हतं, परंतु आता या देशांमध्ये 250 हून अधिक प्रकरणं आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Virus

    पुढील बातम्या