S M L

चुरशीची लढाई : भाजपच्या 'दिग्विजयी' गडाला हे माजी मुख्यमंत्री देणार का धक्का?

मध्य प्रदेशात सलग 10 वर्षं राज्य करणारे दिग्विजय सिंह यांना आता राजधानी काबीज करणं तितकं सोपं राहिलेलं नाही.

Updated On: Apr 3, 2019 09:48 PM IST

चुरशीची लढाई : भाजपच्या 'दिग्विजयी' गडाला हे माजी मुख्यमंत्री देणार का धक्का?

भोपाळ, 3 एप्रिल : लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशच्या राजधानीची बातमी महाराष्ट्रात क्वचितच कधी मोठी होते. मागच्या निवडणुकीच्या वेळी लालकृष्ण अडवाणी यांना भोपाळमधून उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू होती, त्या वेळी हा मतदारसंघ देशभर चर्चेत होता. पण तेही अगदी थोड्या काळासाठी. भोपाळ हा भारतीय जनता पक्षाचा दिग्विजयी गड आहे. कारण 1984 नंतर इथे एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही. आता मात्र या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसने आपला दमदार उमेदवार उभा केला आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाच भोपाळच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे या जागेकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात काँग्रेसचं अंतर्गत राजकारण आहे की हा पक्षाच्या रणनीतीचा भाग आहे याविषयी मध्य प्रदेशात चर्चा सुरू आहेत. पण कारण कुठलंही असलं तरी दिग्विजय सिंहांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे भोपाळची लढत लक्षवेधी ठरणार यात शंका नाही. विशेष म्हणजे भाजपने अद्याप या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

दिग्विजय सिंहांची वाट बिकट


मध्य प्रदेशात सलग 10 वर्षं राज्य करणारे दिग्विजय सिंह यांना आता राजधानी काबीज करणं तितकं सोपं राहिलेलं नाही. या मतदारसंघात 19.5 लाख मतदार आहेत. 1994 मध्ये इथून काँग्रेसचे उमेदवार के. एन. प्रधान जिंकले होते. त्यांच्यानंतर ही जागा काँग्रेसने कधीच जिंकलेली नाही.

भाजपसाठी ही जागा सुरक्षित मानली जाते. तरीही अद्याप पक्षाने या जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. गेल्या 10 दिवसात दिग्विजय सिंह यांनी पूर्ण जोर लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांचा संपूर्ण प्रचार कार्यक्रम ठरलेला आहे. भाजपने मात्र उमेदवारच नाही, त्यामुळे प्रचाराला सुरुवात केलेली नाही.

राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपने या जागेवर फार तगडा उमेदवार न देता लो प्रोफाईल नेता दिला तर दिग्विजय सिंह यांना त्याच्याशी टक्कर देणं थोडं अवघड जाईल. कारण त्यांच्याकडे मग काही ठोस मुद्दा नसेल. याउलट जर उमेदवार भाजपचा मोठा नेता असेल तर दिग्विजय यांच्यासाठी लढत थोडी सोपी होईल.

Loading...

मुस्लीम मतदार महत्त्वाचे

भोपाळमधल्या 19.5 लाख मतदारांपैकी जवळपास 5 लाख मतदार मुस्लीम आहेत. तरीही दर वेळी भाजप ही जागा सहजपणे जिंकून घेतो. कारण हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला मिळतो, असं बोललं जातं. आता मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा काँग्रेसलाही मिळू शकतो, जर मुस्लीमांची एकगठ्ठा मतं त्यांच्या पारड्यात पडली तर! तसं झालं, तर दिग्विजय यांचा विजय सोपा होईल.

भाजपसाठी धोक्याची घंटा

विद्यमान खासदार आलोक संजर यांना भोपाळमधून 2014 च्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. पावणेचार लाख मतांनी ते जिंकून आले होते. या लोकसभा मतदारसंघात 8 विधानसभेच्या जागा येतात. 2018 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली एकूण मतं काँग्रेसपेक्षा फक्त 63000 नी जास्त होती. ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

VIDEO : लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 09:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close