नवी दिल्ली, 21 डिसेंबर : चीनमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. यामुळेच झिरो कोविड पॉलिसी अंतर्गत चीनने अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू केले आहे. त्याविरोधात आता मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे चीनमध्ये दररोज 30,000 हून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहे. त्या तुलनेत भारतात सध्या खूपच कमी आणि कोरोनाची 300-400 प्रकरणे दररोज समोर येत आहेत. मात्र, चीनमधील वाढत्या केसेसमुळे भारतातही पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोरोना पसरण्याची त्यांची वेगळी कारणे आहेत. मात्र, तरीही भारतावर त्याचा परिणाम होणार नाही असे म्हणता येणार नाही. उशिरा का होईना, भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी संचालक डॉ. एम सी मिश्रा म्हणतात की डेल्टा (कोरोना व्हेरिएंट) सारखे नवीन प्रकार आले नाही तर चीनमधील वाढत्या आकडेवारीचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही.
वाचा - Gujarat Elections : गुजरातमध्ये आपची सत्ता येणार; केजरीवालांनी थेट लिहूनच दिलं!
डॉ. मिश्रा म्हणतात की चीनच्या शून्य कोविड धोरणामुळेच त्यांना फटका बसला आहे. तिथल्या लोकांना ओमिक्रॉन सारख्या कोरोनाच्या सौम्य प्रकारांचा संसर्ग झाला नाही. परिणामी त्यांच्यामध्ये कोरोनाविरूद्ध हर्ड इम्युनिटी विकसित होऊ शकली नाही. याशिवाय चीनमध्ये फारच कमी लसीकरण झाले आहे. तेथील बहुतांश लोकसंख्येला कोरोनाची लस मिळालेली नाही, त्यामुळे कोरोनाच्या कोणत्याही प्रकाराचा संसर्ग त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
भारताचा विचार करता, येथील कोरोना लसीकरण उत्कृष्ट झाले आहे. अनेकांनी बूस्टर डोसही घेतला आहे. येथे अजूनही लस उपलब्ध आहे, लोकांना हवे असल्यास ते लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. याशिवाय ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर येथील लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी निर्माण झाली असून लसीकरणानंतर सुपर इम्युनिटी विकसित झाली आहे. त्यामुळे, जर नवीन प्रकार आला नाही तर चीनच्या आकडेवारीचा येथे फारसा परिणाम होणार नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona spread