गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला;उद्या मतदान

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला;उद्या मतदान

पहिल्या टप्प्यात गुजरातमधील 19 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये कच्छच्या 6, सौराष्ट्रच्या 48 आणि दक्षिण गुजरातच्या सात जागांसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 12 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

  • Share this:

08 डिसेंबर: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला. 89 जांगासाठी उद्या मतदान होतंय. 89 जागांसाठी 977 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पहिल्या टप्प्यात गुजरातमधील 19 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये कच्छच्या 6, सौराष्ट्रच्या 48 आणि दक्षिण गुजरातच्या सात जागांसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 12 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाची गुजरातची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार असा अंदाज आहे. काँग्रेस संपूर्ण ताकदिनिशी या निवडणुकीत उतरलीय. तर भाजपसमोरही ही निवडणूक अगदीच एकतर्फी राहिलेली नाही.

सत्ताधारी भाजपला धक्का देण्याचा मनसुबा आखून शिवसेनेने विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या सुमारे पाच ते सहा लाख मराठी मतांच्या भरवशावर शिवसेनेने गुजरातवर स्वारी करण्याची योजना आखली आहे. शिवसेनेने गुजरातमधील ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. त्यातही सुरत जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हार्दिक पटेलची मदत घेत शिवसेनेने मुंबईकर शिवसैनिकांची फौज गुजरातला रवाना झाली आहे.

First Published: Dec 8, 2017 08:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading