पंतप्रधानांच्या सभेत कॅमेरामनला भोवळ, मोदींनी भाषण थांबवून केली मदत!

पंतप्रधानांच्या सभेत कॅमेरामनला भोवळ, मोदींनी भाषण थांबवून केली मदत!

ही घटना दिसताच पंतप्रधानांनी भाषण थांबविलं आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या कॅमेरामनला मदत करण्यास सांगितलं.

  • Share this:

सुरत 30 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरतच्या सभेत घडलेल्या एका घटनेने पंतप्रधानांना बुधवारी मध्येच आपलं भाषण थांबवावं लागलं. पंतप्रधान हे एका जाहीर सभेत भाषण करत होते. त्याचं भाषण सुरू असतानाच समोर कव्हरेज करत असलेल्या कॅमेरामनला चक्कर आली आणि तो खाली कोसळला पंतप्रधानांनी आपलं भाषण मध्येच थांबवलं आणि त्याला दवाखान्यात येण्याच्या सूचना केल्या.

पंतप्रधानांच्या सभेत भोवळ आलेल्या कॅमेरामनचं नाव किशन रामोलिया असं आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर उपचारानंतर काही वेळातच त्याची प्रकृती सुधारली. कॅमेरामन सकाळपासून कार्यक्रम स्थळी होता. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांना पाणी घेऊन आत जाऊ दिलं जात नव्हतं. त्यामुळे सकाळपासून त्याने पाणीही घेतलं नव्हतं. डिहायड्रेशन झाल्याने त्याला चक्कर आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ही घटना दिसताच पंतप्रधानांनी भाषण थांबविलं आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या कॅमेरामनला मदत करण्यास सांगितलं. तो अॅम्बुलन्समध्ये बसल्याची खात्री झाल्यावरच पंतप्रधानांनी आपलं भाषण सुरू केलं.

राहुल गांधी यांनीही केली होती मदत

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी 25 जानेवारीला ओडिशाच्या दौऱ्यावर होते. भुवनेश्वर विमानतळावर आगमन झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. ढोल ताशे आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. विमानतळाच्या परिसरात राहुल गांधी हे काही नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतानाच ही घटना घडली.

राहुल गांधी चर्चा करत असतानाच बाजूला पायऱ्याही होत्या. पायऱ्यांपासून  काही अंतरावर त्यांची चर्चा सुरू असतानाच तिथे काही फोटोग्राफर्सही होते. त्यांचं फोटं कढणं सुरू असतानाच एका फोटोग्राफरचा पाय पायऱ्यांवरून घसरला. मागे सरकत असताना त्याला पायऱ्या आहेत हे कळलेच नाही. अचानक तोल गेल्याने तो खाली पडला. नंतर राहुल गांधींनी त्याला आधार देत मदत केली होती.

First published: January 30, 2019, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading