#PGStory : डेटवर गेलेल्या मैत्रिणीला रात्री उशिरा PG मध्ये आणण्यासाठी बोलवली चक्क अॅम्ब्युलन्स

#PGStory : डेटवर गेलेल्या मैत्रिणीला रात्री उशिरा PG मध्ये आणण्यासाठी बोलवली चक्क अॅम्ब्युलन्स

घरापासून दूर शिक्षण वा कामासाठी पीजीमध्ये राहण्याचा अनुभव खूप भारी असतो. तो तुम्हाला बरंच काही शिकवून जातो, आणि जीवाला जीव देणारी मैत्री देऊन जातो.

  • Share this:

मुंबई, 7 मे : शिक्षण अथवा कामासाठी घराबाहेर एखाद्या पीजीमध्ये राहण्याचा अनुभव खूप भारी असतो. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं म्हणतात. तो तुम्हाला अनुभवसंपन्न तर बनवतोच शिवाय ह्रदयाशी जोडणारी नाती मिळवून देतो. सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिमित्ताने आपल्या पीजीच्या आठवणींचा उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

पीजीमधील मैत्रिणींसोबत एक वेगळंच नातं असतं. घरापासून लांब राहत असताना त्यांचाच आपल्याला मायेचा आधार असतो. काहीसोबत आपला मैत्रिचा बंध जुळत नसेलही. आजच्या सदरातील कथा आहे 29 वर्षांच्या वंदनाची. वंदना 19 व्या वर्षी बीटेक करण्यासाठी दिल्लीहून जयपूरला गेली. या तिच्या घराबाहेर प्रवासात ती खूप हसली, रडली आणि आयुष्य अनुभवसंपन्न केलं.

साधारण 2007 मध्ये वंदना बीटेक करण्यासाठी जयपूरला गेली. अर्थात आई-बाबा जयपूरला सोडण्यासाठी तिच्या सोबत होतेच. हळूच वंदनाने खिडकीच्या बाहेरुन चेहरा बाहेर काढला आणि मोकळी हवा चेहऱ्यावर घेतली. आता रात्रीचं बाहेर फिरायला मिळेल, खूप स्वातंत्र्य मिळेल या विचाराने ती शहारून गेली. जयपूरला पोहोचल्यानंतर पीजीची नोंदणी आदी सर्व कामे झाली होती. आई-बाबा कारमध्ये बसून निघाले. जशी त्यांची गाडी गेटबाहेर गेली, वंदनाच्या मनात एकमद धस्सं झालं. यापूर्वी कधीच ती आईला सोडून राहिली नव्हती. दारात उभी राहूनचं ती ढसाढसा रडू लागली. त्यानंतर पुढचे तीन दिवस असेच गेले. चौथ्या दिवशी एक पीजी मेट तिच्या खोलीत आली. तिने हळूच गालावरुन अश्रू पुसले. एकदम आईची आठवण आली. हळूहळू वंदना पीजीमधील मैत्रिणींसोबत मिसळू लागली.

पहिला एक महिला तर सीनिअर विद्यार्थिनीनीं खूप रॅगिंग केलं. महिनाभर वेगवेगळ्या रंगाचा दुपट्टा, कुर्ता आणि वेगळ्याच रंगाचा पायजमा असा पोशाख करावा लागे. त्याशिवाय दोन वेण्या आणि त्याला वेगवेगळ्या रंगाच्या रिबिनी हा नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचा पहिल्या महिन्याचा पोशाख होता. तो ही महिना असाच मजेत आणि अभ्यासात गेला. हळूहळू वंदनालाही ते वातावरण आवडू लागलं होतं. पीजीचं जेवणं अगदी कंटाळवाणं असलं तरी कॉलजमध्ये जाताना फास्ट फूट आदी खाण्याचा चंग असे. त्यात मैत्रिणींसोबत एकमेकांना साथ देत दिवस खऱ्या अर्थाने यादगार बनत होता.

पीजीमध्ये रात्री 9 नंतर बाहेर जाण्यास परवानगी नव्हती. केवळ आवारात असलेल्या रुग्णालयातच जाता येत होतं. एकेदिवशी डेटला गेलेली एक मैत्रिण रात्री 9 वाजले तरी आली नव्हती. सर्व मैत्रिणी चिंतेत होत्या. ती आली नाही तर शिक्षा तर मिळालीच असती शिवाय पालकांकडे तक्रार गेली असती. या भीतीने एका मैत्रिणीने एक प्लान केला. एकीने आजारी असल्याचं नाटक केलं आणि वॉर्डनला रुग्णालयात जायचे असल्याचे सांगितले. यावेळी वॉर्डनने रुग्णवाहिका बोलावली आणि आजारी विद्यार्थिनीसोबत केवळ 2 मुलींना जाण्याची परवानगी दिली. डेटवर गेलेली आमची मैत्रिण रस्त्यातचं भेटली. रुग्णवाहिकेच्या चालकाला सर्व हकीकत सांगितली. काका काका म्हणत त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयाच्या नियमांप्रमाणे रुग्णालयात जाणे भाग होते. याशिवाय तेथील डॉक्टर काहीही झालं तरी ग्लुकोजची एक बाटली तर चढवायचाच. मात्र आजारी पडलेल्या मैत्रिणीने मात्र सूई टोचून घेण्यास नकार दिला.

अशावेळी डॉक्टरांनाही वेड्यात काढलं आणि त्यांना औषधं देण्याची विनंती केली. अशा अवस्थेत रुग्णवाहिका पीजीजवळ आली. वॉर्डन जागीच होती. त्यांनी चार मुलींना पाहून मी फक्त दोघींना पाठवलं असल्याचं सांगितलं. मात्र अशाही परिस्थितीत आम्ही तिघीचं गेल्याचं वॉर्डनला पटवून दिलं. यावेळी काही मैत्रिणींनी आधीच वॉर्डनच्या रजिस्टरमध्ये त्या मैत्रिणीची हजेरी लावली होती. अखेर यातून आम्ही त्या मैत्रिणीला वाचवलं. मात्र असं असलं तरी रुमवर गेल्यावर तिची सर्वांनी मिळून चांगलीच धुलाई केली.

हे वाचा - कधीकाळी एकता कपूरशी लग्न करायला तयार झाला होता करण जोहर, पण...

First published: May 7, 2020, 3:58 PM IST

ताज्या बातम्या