Home /News /national /

'पक्षासाठी 3 कोटी पाहिजेत', अमित शहांच्या नावाने केला फोन आणि...

'पक्षासाठी 3 कोटी पाहिजेत', अमित शहांच्या नावाने केला फोन आणि...

अमित शहा पक्षाच्या निधीसाठी 3 कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा कॉल एका मंत्र्यांना आला. त्याची चौकशी करताच असा कोणताही कॉल अमित शहांकडून आला नसल्याचे स्पष्ट झाले.

    नवी दिल्ली, 28 डिसेंबर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाने फसवणुक करण्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने याबाबत अद्याप संपूर्ण माहिती दिलेली नाही. ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे. हरियाणा सरकारमधील मंत्री रणजित सिंग यांना 20 डिसेंबरला एका अॅपमधून कॉल करण्यात आला होता की, अमित शहा पक्षाच्या निधीसाठी 3 कोटी रुपयांची मागणी करत आहेत. पण चौकशी केल्यानंतर अमित शहांच्या घरातून कोणताही फोन करण्यात आल्याचे समजले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात जगतार सिंग आणि उपकार सिंग नावाच्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली परिसरात फसवणुकीचे असे अनेक प्रकरा उघडकीस येत आहेत. याआधी दिल्ली पोलिसात नोकरी लावतो म्हणून बतावणी करणाऱ्या एका कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली होती.  पोलिसांनी या प्रकरणात 6 लोकांना ताब्यात घेतलं होतं. तसेच 18 मोबाइल, 13 हार्ड डिस्क, एक सर्व्हर, 12 हेडफोन, 4 लॅपटॉप, 5 डेबिट कार्डही जप्त करण्यात आली होती. याशिवाय 5 बँक खाती सील करण्यात आली आहेत. यापूर्वी दिल्लीत एका परदेशी पर्यटकालाही लुटल्याची घटना घडली होती. यामध्ये दिल्ली बंद असल्याचे सांगून परदेशी पर्यटकाला इतरत्र फिरवून त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले होते. रिक्षावाला आणि टॅक्सी ड्रायव्हरसह ट्रॅव्हल एजंटने मिळून परदेशी पर्यटकाला गंडा घातला होता. याची तक्रारही पोलिसात दाखल करण्यात आली होती. CAA : मुस्लिम समाजाने प्रशासनाला नुकसान भरपाई म्हणून दिले 6 लाख रुपये
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Amit Shah

    पुढील बातम्या