Home /News /national /

राँग नंबर लागला अन् सुरू झालं प्रेमाचं नवं प्रकरणं; शेवटी मात्र परिसीमाच गाठली 

राँग नंबर लागला अन् सुरू झालं प्रेमाचं नवं प्रकरणं; शेवटी मात्र परिसीमाच गाठली 

राँग नंबरचं असं प्रेम प्रकरण तुम्ही याआधी पाहिलं नसेल...

    पाटना, 5 जून : प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. कधी कोणाशी सूत जुळतील, काही सांगता येत नाही. अशीच एक घटना (Bihar News) बिहारमधील पाटनामधून समोर आली आहे. येथे फोनवर आलेल्या राँग नंबरपासून प्रेमाची सुरुवात झाली, प्रेमाने परिसीमा गाठली अन् प्रियकर आपल्या प्रेयसीला घेऊन सूरतला निघून गेला. संशयाच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी मुगलसराय रेल्वे स्टेशनवर त्यांची चौकशी केली. त्यानंतर दोघांनी आपली कहाणी सांगितली. प्रेमात दोघेही घरातून पळाले... पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांना सोपवलं. यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी मंदिरात लग्न लावून दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमादित्य शर्मा यांचा मुलगा अंकीत कुमार याचं आरोपूर येथील नवनीत शर्माची मुलगी श्रेया राजला राँग नंबर लागला होता. यानंतर त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. दोघेही 2021 मध्ये प्रेमात पडले. यानंतर 2 जून 2022 रोजी दोघे घरातून पळून गेले. यादरम्यान ट्रेनमध्ये रेल्वे पोलिसांनी मुगलसरायमध्ये दोघांना पकडलं. राँग नंबरमुळे सुरू झाली बातचीत... यानंतर दोघांचे कुटुंबीय तेथे पोहोचले आणि त्यांनी तेथील एका मंदिरात दोघांचं लग्न लावून दिलं. दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीदरम्यान दोघांनी कबुल केलं की, गेल्या वर्षभरापासून ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. राँग नंबरमुळे दोघांमध्ये बातचीत सुरू झाली होती. सुरुवातीला मुलीने बोलण्यास नकार दिला होता. मात्र काही दिवसांनंतर दोघेही बोलू लागले. यानंतर हळूहळू मैत्री वाढली आणि दोघांनी एकमेकांना आपआपले फोटो पाठवले. यानंतर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बोलू लागले आणि शेवटी दोघांनी एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Love

    पुढील बातम्या