News18 Lokmat

अमित शहांना धक्का, पश्चिम बंगालमध्ये भाजपची रथयात्रा नाहीच

या निर्णयामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलचा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 04:29 PM IST

अमित शहांना धक्का, पश्चिम बंगालमध्ये भाजपची रथयात्रा नाहीच

कोलकता, 21 डिसेंबर : कोलकता हायकोर्टाच्या एकसदस्यीय खंडपीठानं दिलेला निर्णय मोठ्या खंडपीठाने फिरवला आहे. भाजपला राज्यात रथयात्रा काढण्याला कोर्टाने परवानगी दिली नाही. एकसदस्यीय खंडपीठाने राज्याच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्याचा आढावा घ्यावा असं मत व्दिसदस्यीय खंडपीठाने व्यक्त केलं. त्यामुळं भाजपच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय.


या निर्णयामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलचा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.  पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्याचा भाजपच्या प्रस्तावाला कोलकता हायकोर्टाने हिरवा कंदील दिला होता. या निर्णयाला पश्चिम बंगाल सरकारने आव्हान दिलं होतं.


कोलकता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देबाशीश करगुप्ता आणि शामपा सरकार या दोन सदस्य असलेल्या खंडपीठाने सुनावणी झाल्यानंतर निर्णयाला स्थगिती दिली. हे प्रकरण पुन्हा एक सदस्य असलेल्या खंडपीठाकडे फेरविचारासाठी पाठवलं आहे.

Loading...


भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आढवड्यात कुचबिहार येथून रथयात्रेला सुरूवात करणार होते. मात्र पश्चिम बंगाल सरकारनं त्याला परवानगी दिली नव्हती. तर हायकोर्टानही तात्पुरती बंदी घातली होती. भाजपने त्याला आव्हान दिलं होत.  काही अटींवर न्यायालयाने गुरुवारी ही परवानगी दिली होती.


रथयात्रेची सर्व माहिती राज्य सरकारला देणं भाजपला बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडणार नाही याचीही काळी घ्यावी लागेल असं न्यायालयाने म्हटलं होतं. रथयात्रेला परवानगी दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडेल असं कारण राज्य सरकारने दिलं होत.


मात्र सर्व नियम पाळण्याची हमी भाजप देणार असेल तर परवानगी नाकारता येणार नाही असंही कोर्टानं म्हटलं होतं. आता भाजप पुन्हा या निर्णयाला आव्हान देणार आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...