मोठ्या E-commerce कंपन्यांविरुद्ध CAITने थोपटले दंड, पंतप्रधानांकडे केली तक्रार

मोठ्या E-commerce कंपन्यांविरुद्ध CAITने थोपटले दंड, पंतप्रधानांकडे केली तक्रार

CAITने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, या कंपन्या सातत्याने FDIच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 29 नोव्हेंबर:  देशातल्या बड्या E-commerce कंपन्यांविरुद्ध व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या CAITने दंड थोपटले आहेत. Amazon आणि Flipkart सारख्या बड्या कंपन्यांनी आपली मक्तेदारी निर्माण केली असून FDIच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे असा आरोप CAIT(Confederation of All India Traders)ने केला आहे. CAIT गेली काही वर्ष या कंपन्यांविरुद्ध सातत्याने आवाज उठवत आहे. या कंपन्यांच्या आक्रमक धोरणांमुळे देशातल्या छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असून या कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करणारं पत्र CAITने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.

CAITने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, या कंपन्या सातत्याने FDIच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत. मोठं मोठे सेल जाहीर करणं, भुलवणाऱ्या ऑफर्स, पैशांची सुट अशा अनेक गोष्टी या कंपन्या सातत्याने जाहीर करतात. नियमानुसार त्या असं करू शकत नाही. या गोष्टींबद्दल संबंधित विभागाकडे सातत्याने तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र कुठलाही विभाग या कंपन्यांवर कारवाई करत नाही अशी तक्रारही या कंपन्यांनी केली आहे.

मात्र आम्ही कुठल्याही नियमांचं उल्लंघन करत नाही असा दावा या कंपन्या कायम करत असतात.

या कंपन्यांनी किराणा क्षेत्रातही 35 हजार कोटींची गुंतवणूक केली असून त्याचा सर्वात मोठा फटका हा देशातल्या छोटा किराणा व्यापाऱ्यांना बसल्याचं CAITचे अध्यक्ष बी.सी. भारतीय आणि सचिव प्रविण खंडेलवाल यांनी म्हटलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तर या कंपन्यांनी आपला प्रचंड विस्तार केला असून  सोशल डिस्टन्सिंगमुळे नागरीकांनी ऑनलाईन शॉपिंगवर जास्त भर दिला होता.

मात्र त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना आणि मोठ्या दुकानदारांनाही फटका बसला. या बड्या कंपन्यांकडे प्रचंड पैसा असून त्याच्या जोरावर ते मोठ्या संख्येत माल घेतात आणि थोडी किंमत कमी करून तो विकतात. त्यामुळे पारंपरिक व्यापारी चक्रच विस्कळीत झालं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 29, 2020, 9:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading