मराठी बातम्या /बातम्या /देश /अ‍ॅमेझॉन-गांजा प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या एसपींची अचानक बदली; सीएआयटी करणार आंदोलन

अ‍ॅमेझॉन-गांजा प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या एसपींची अचानक बदली; सीएआयटी करणार आंदोलन

mp police

mp police

अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून गांजा तस्करी करणारं रॅकेट उघडकीस आणणाऱ्या एस. पी. मनोज कुमार सिंह (Bhind SP transferred) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 2 डिसेंबर: अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून गांजा तस्करी करणारं रॅकेट मध्य प्रदेशमधल्या भिंड पोलिसांनी (Bhind Police busted Ganja racket) काही दिवसांपूर्वी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात मध्य प्रदेश आणि विशाखापट्टणममधून काही व्यक्तींना अटकही करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. कारण आता या प्रकरणाचा पर्दाफाश करणारे एस. पी. मनोज कुमार सिंह (Bhind SP transferred) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना भोपाळ पोलीस मुख्यालयात (Bhopal PHQ) पाठवण्यात आलं असून, पोलीस मुख्यालयातले शैलेंद्र चौहान हे भिंडचे एसपी म्हणून मनोज कुमार सिंह यांची जागा घेणार आहेत.

मनोज कुमार सिंह यांनी भिंडचे एसपी म्हणून पदभार स्वीकारून एक वर्षही (Bhind SP transferred amid Amazon Ganja case) झालं नव्हतं. त्यापूर्वीच ही बदली करण्यात आल्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) हे सर्व अ‍ॅमेझॉनच्या दबावाखाली होत असल्याचा आरोप केला आहे. या ई-कॉमर्स वेबसाइटने मध्य प्रदेश सरकारवर दबाव (MP Govt working under Amazon’s pressure) आणून अधिकाऱ्यांची बदली करायला लावली असल्याचं सीएआयटीचं म्हणणं आहे. या संघटनेने या प्रकरणी निषेधही व्यक्त केला आहे.

“मनोज सिंह या अधिकाऱ्याने हे संपूर्ण प्रकरण अतिशय प्रामाणिकपणे हाताळलं. आता त्यांची तडकाफडकी भोपाळ मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झाला नसूनही ही बदली होणं अतिशय आश्चर्यकारक आहे. सिंह यांचं पथक अॅमेझॉनविरुद्ध कारवाई करणार होतं, त्यापूर्वीच ही बदली करण्यात आल्यामुळे, आपली व्यवस्था परकीय कंपन्यांच्या दबावाखाली कशी झुकली जाते, हेच सिद्ध होत आहे,” असं मत सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष (CAIT national President) बी. सी. भारतीय आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केलं आहे.

मध्य प्रदेशातले आणि भारतातले ट्रेडर्स या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार असून, सीएआयटी लवकरच या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारविरोधात आंदोलन (CAIT Agitation) पुकारणार आहे. आंदोलनाबाबत सर्व माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचंही या वेळी सीएआयटीकडून स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान, या गांजा प्रकरणात मध्य प्रदेशातून आणि विशाखापट्टणमहून कित्येकांना अटक करण्यात आली आहे. विशाखापट्टणमहून कढीपत्त्याच्या नावाखाली हा गांजा भिंडमध्ये आणण्यात येत होता. गेल्या आठ महिन्यांमध्ये सुमारे 600 ते 700 किलो गांजा विशाखापट्टणमहून मध्य प्रदेशात आणला गेला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Amazon, Madhya pradesh, Online crime, Police