राफेल : अखेर कॅगचा अहवाल राज्यसभेत सादर; मोदी सरकारला दिलासा

राफेल : अखेर कॅगचा अहवाल राज्यसभेत सादर; मोदी सरकारला दिलासा

राफेल करारासंदर्भात CAG चा अहवाल राज्यसभेत सादर झाला. राफेल करार खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. कॅगचा अहवाल सादर झाल्यावर सत्य समोर येईल, असंही बोललं जात होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : मोदी सरकारने केलेला राफेल विमान खरेदी करार हा UPA ने केलेल्या करारापेक्षा स्वस्त असल्याचा तपशील कॅगच्या अहवालात आहे. त्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. राफेल करारासंदर्भात CAG चा अहवाल राज्यसभेत सादर झाला.

राफेल करार खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. कॅगचा अहवाल सादर झाल्यावर सत्य समोर येईल, असंही बोललं जात होतं. पण आता कॅगच्या अहवालात कराराची किंमत  2.86 टक्क्यांनी कमी झाल्याचं म्हटलं गेलं आहे.

126 एअरक्राफ्ट खरेदीच्या या नव्या करारानुसार भारताने 17.08 टक्के कमी पैशात विमान खरेदी केल्याचा अहवाल सांगतो.

न्यूज18 लोकमतचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. राहुल गांधी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळ राफेल प्रकरणी कॅगच्या अहवालाचा काय समाचार घेतात हे पाहावं लागेल.

दरम्यान मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी अनिल अंबानींचं नाव घेत मोदींनी मध्यस्थीचं समर्थन केल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी ते या आरोपाखाली जेलमध्ये जाऊ शकतात, असंही म्हटलं होतं. आता कॅगच्या अहवालानंतर या करारात काही गडबड आहे की नाही, हे स्पष्ट होईल.

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाली केली आहे. मोदींनी राफेलप्रकरणी मध्यस्थाची भूमिका वठवली,' असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच राफेल प्रकरणात मोदींनी संरक्षण कराराबाबतची गोपनीयता मोडली आहे, या मुद्द्यावर ते जेलमध्ये जाऊ शकतात, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींचे हे आहेत आरोप

- अनिल अंबानींना फायदा पोहचण्यासाठी मोदींकडून प्रयत्न

- राफेल प्रकरणी आणखी एक ईमेल समोर आला आहे

- पंतप्रधान मोदींकडून गोपनियतेचा भंग

संरक्षणविषयक गोपनीयतेचा मोदींकडून भंग

- राफेल प्रकरणात भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांबाबत आता चौकशी झाली पाहिजे

- पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे

- अनिल अंबानींना संरक्षण कराराची माहिती आधीच कशी मिळाली? याचं उत्तर फक्त मोदीच देऊ शकतात.

- तुम्ही राफेलमध्ये भ्रष्टाचार केला नसेल तर चौकशी का टाळत आहात? मोदींना सवाल

- विरोधकांची काय चौकशी करायची ती करा, पण राफेलचीही चौकशी करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading