राफेल करारावरील ‘कॅग’चा रिपोर्ट न्यूज18 लोकमतच्या हाती; जसा आहे तसा रिपोर्ट!

राफेल करारासंदर्भात 'कॅग'नं सादर केलेला रिपोर्ट 'न्यूज18 लोकमत'च्या हाती लागला आहे.

ram deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2019 04:45 PM IST

राफेल करारावरील ‘कॅग’चा रिपोर्ट न्यूज18 लोकमतच्या हाती; जसा आहे तसा रिपोर्ट!

मुंबई, 13 फेब्रुवारी : राफेल करारासंदर्भात कॅगनं राज्यसभेत अखेर रिपोर्ट सादर केला. कॅगनं सादर केलेल्या रिपोर्टमध्ये कराराची किंमत  2.86 टक्क्यांनी कमी झाल्याचं म्हटलं गेलं आहे. 126 एअरक्राफ्ट खरेदीच्या या नव्या करारानुसार भारताने 17.08 टक्के कमी पैशात विमान खरेदी केल्याचा अहवाल सांगतो. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा शिवाय 2007च्या तुलनेत राफेल विमानांची खरेदी जास्त दरानं झाल्याचा आरोप वेळोवेळी केला होता. पण, कॅगच्या अहवालामुळे मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बॅकफूटला गेल्याचं चित्र आहे. कॅगचा रिपोर्ट न्यूज18 लोकमतकडे आहे.

वाचा रिपोर्ट जसा आहे तसा CAG Full Report

‘कॅग’वर सरकराचं नियंत्रण?

राज्यघटनेच्या कलम 148 नुसार या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे ‘कॅग’ ही संस्था घटनात्मक आहे. ‘कॅग’ची निवड पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ करते. त्यानंतर देशाचे राष्ट्रपती ‘कॅग’ची नेमणूक करतात. ‘कॅग’द्वारे सरकारी कामं आणि खर्चाची पडताळणी केली जात असल्यानं त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घटनेमध्ये घेतली गेलेली आहे. त्यामुळे ‘कॅग’मध्ये सरकार कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही.

हे आहेत राहुल गांधींचे आरोप

Loading...

- अनिल अंबानींना फायदा पोहचण्यासाठी मोदींकडून प्रयत्न

- राफेल प्रकरणी आणखी एक ईमेल समोर आला आहे

- पंतप्रधान मोदींकडून गोपनियतेचा भंग

संरक्षणविषयक गोपनीयतेचा मोदींकडून भंग

- राफेल प्रकरणात भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांबाबत आता चौकशी झाली पाहिजे

- पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे

- अनिल अंबानींना संरक्षण कराराची माहिती आधीच कशी मिळाली? याचं उत्तर फक्त मोदीच देऊ शकतात.

- तुम्ही राफेलमध्ये भ्रष्टाचार केला नसेल तर चौकशी का टाळत आहात? मोदींना सवाल

- विरोधकांची काय चौकशी करायची ती करा, पण राफेलचीही चौकशी करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...