CCDचे मालक व्ही.जी. सिद्धार्थांनी आत्महत्या केल्याची भीती, बेपत्ता होण्यामागे 7 हजार कोटींचं कनेक्शन?

CCDचे मालक व्ही.जी. सिद्धार्थांनी आत्महत्या केल्याची भीती, बेपत्ता होण्यामागे 7 हजार कोटींचं कनेक्शन?

बेपत्ता होण्यापूर्वी व्ही.जी. सिद्धार्थ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी सिद्धार्थ यांनी एका माजी आयकर अधिकाऱ्यावर छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

बंगळुरू, 30 जुलै : कॅफे कॉफी डे (CCD)चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ मंगळवारी (30 जुलै) सकाळी बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (29 जुलै) मंगळुरूकडे येताना वाटेत आपली कार थांबून ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. तेव्हापासूनच ते बेपत्ता आहेत. ही घटना सोमवारी (29 जुलै) संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सिद्धार्थ अचानक बेपत्ता झाल्यानं त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. घरातील सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि कोस्ट गार्डची मदत घेतली आहे. पण ठोस माहिती मिळवण्यास पोलिसांना यश आलेलं नाही.

7 हजार कोटींचं कनेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, CCDवर 7 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज होतं. सिद्धार्थ यांनी बेपत्ता होण्यापूर्वी आपल्या कंपनीच्या CFOसोबत 56 सेकंदांसाठी बातचित केली होती. यामध्ये त्यांनी CFOला आपल्या कंपनीची योग्यपद्धतीनं  देखभाल करण्यास सांगितलं. यावेळेस ते नैराश्यामध्ये देखील होते. CFOसह बोलणी झाल्यानंतर त्यांनी आपला फोन स्विच ऑफ केला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या पुलावरून ते बेपत्ता झालेत, तिथून जवळपास 600 मीटर अंतरावर समुद्र आहे आणि सोमवारी रात्री समुद्राला भरतीदेखील आली होती. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असल्यानं समुद्र आणि नदी परिसरात शोध सुरू आहे.

(वाचा :'CCD'चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ बेपत्ता; प्रवासावेळी नदीच्या पुलावर उतरले आणि...)

(वाचा : राजीनामा दिल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, उदयनराजेंबद्दल म्हणाले...)

माजी आयकर अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप

या सर्व घडामोडींदरम्यान सिद्धार्थ यांचं CCDच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. या पत्रात त्यांनी बिझनेस मॉडेल अपयशी ठरल्याचं बाब नमूद केलं आहे. शिवाय आर्थिक संघर्षदेखील मांडला आहे.

सिद्धार्थ यांनी पत्रात लिहिलंय की,' कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग केल्याबद्दल वाईट वाटत आहे. मी लढलो, पण आता मी पराभव स्वीकारला आहे. माझ्या एका इक्विटी पार्टनर्सचा दबाव आणखी सहन करू शकणार नाही. माझ्यावर सतत शेअर बायबॅक (पुन्हा खरेदी)करण्यासंदर्भात दबाव टाकला जात आहे. कर्जदात्यांकडूनही दबाव येत आहे. महत्त्वाचे म्हणजे सिद्धार्थ यांनी एका माजी आयकर अधिकाऱ्याने छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अधिकाऱ्याने मालमत्तेवर जप्ती आणून व्यवसायाचे करार रोखण्याचंही काम केले,असेही त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

(वाचा :राष्ट्रवादी करणार पलटवार, नवी मुंबईतील खेळी भाजपवरच उलटवण्यासाठी नेते मैदानात)

सिद्धार्थ यांच्या कारचालकानं काय सांगितलं ?

चालकानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये असताना सिद्धार्थ बराच वेळ फोनवर कोणासोबत तरी बोलत होते. यानंतर नेत्रावती नदीच्या पुलावर त्यांनी कार थांबवण्यास सांगितले आणि खाली उतरले. त्यानंतर ते बेपत्ताच झाले. चालकानं दिलेल्या माहितीवरून पोलीस आता सिद्धार्थ यांचे फोन रेकॉर्ड तपास आहेत, जेणेकरून बेपत्ता होण्यापूर्वी त्यांचे कोणाकोणाशी बोलणं झालं होतं हे समजू शकेल आणि शोधकार्यात मदत होईल.

सिद्धार्थ यांच्याकडे आहेत कॉफीच्या बागा

आशियामध्ये प्रसिद्ध असलेली कॉफी इस्टेट कंपनी 'कॅफे कॉफी डे' चे मालक संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ यांचं कुटुंब 150 वर्षे जुनी कॉफीच्या शेती संस्कृतीसोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे कॉफीच्या बागा आहेत. 90 च्या दशकात कॉफीचं मुख्यतः दक्षिण भारतातच घेतले जाते होते. विशेषतः येथील कॉफीला पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रचंड मागणी होती. सिद्धार्थ यांना ही कॉफी सर्वदूर पोहोचवण्याची इच्छा होती. सिद्धार्थ यांचे परिश्रम आणि त्यांचा कौटुंबिक कॉफीचा व्यवसाय यामुळेचे 'कॅफे कॉफी डे'चं स्वप्न सत्यात उतरू शकले.

...आणि 'कॅफे कॉफी डे'चं स्वप्न झालं पूर्ण

'कॅफे कॉफी डे'ची सुरुवात जुलै 1996मध्ये बंगळुरूतील बिग्रेड रोड येथील पहिलं कॉफी शॉप इंटरनेट कॅफेपासून झाली. यानंतर CCDनं देशभरात 'कॅफे कॉफी डे'च्या रुपात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आताच्या घडीला देशभरात 247 शहरांमध्ये सीसीडीचे एकूण 1 हजार 758 कॅफे शॉप आहेत.

नवी मुंबईतील राजकारणात नवा ट्विस्ट, नाईकांच्या भाजप प्रवेशाबद्दल सस्पेन्स

Published by: Akshay Shitole
First published: July 30, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading