निर्मला सीतारामन नव्या संरक्षण मंत्री, इंदिरा गांधींनंतर ठरल्या दुसऱ्या महिला

निर्मला सीतारमन देशाच्या पूर्णवेळ नव्या संरक्षणमंत्री असणार आहेत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2017 03:56 PM IST

निर्मला सीतारामन नव्या संरक्षण मंत्री, इंदिरा गांधींनंतर ठरल्या दुसऱ्या महिला

03 सप्टेंबर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाचं संरक्षणमंत्रिपद भूषवण्याचा बहुमान केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांना मिळालाय.  निर्मला सीतारमन देशाच्या पूर्णवेळ नव्या संरक्षणमंत्री असणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलंय.

2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केलाय. खांदेपालट करताना नरेंद्र मोदींनी चार मंत्र्यांनी बढती दिली तर 9 चेहऱ्यांना संधी दिलीये. मनोहर पर्रिकर गोव्यात परतल्यामुळे संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सोपवला होता. मंत्रिमंडळाच्या विस्तारात देशाला संपूर्ण संरक्षणमंत्री मिळणार अशी चर्चा सुरू होती. संरक्षणमंत्रिपदासाठी सुषमा स्वराज यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, मोदी आणि शहा यांनी धक्कातंत्रांचा अवलंब करत आश्चर्यमय खातेवाटप केलंय.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारमन यांना कॅबिनेटमध्ये बढती देण्यात आलीये. त्यांची निवड थेट देशाच्या संरक्षणमंत्रिपदी करण्यात आलीये. काँग्रेसच्या दिवंगत नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर निर्मला सीतारमन संरक्षणमंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत. इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये आणि 14 जानेवारी 1980 ते 1982 या काळात संरक्षणमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर आता निर्मला सीतारमन यांची संरक्षणमंत्रीपदी निवड झालीये.

निर्मला सीतारमन यांनी आपलं  शिक्षण तामिळनाडूच्या सीतालक्ष्मी रामास्वामी काॅलेजमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमफील केलंय. निर्मला सीतारमन 2003 ते 2005 पर्यंत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदही भूषवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2017 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...