'भारत हा ढाण्या वाघ तर पाकिस्तान मांजर', मोदींच्या या मंत्र्यांनी इम्रान खान यांना ठणकावलं

'भारत हा ढाण्या वाघ तर पाकिस्तान मांजर', मोदींच्या या मंत्र्यांनी इम्रान खान यांना ठणकावलं

उत्तर प्रदेशात मथुरामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदास आठवले म्हणाले, जर पाकिस्तानला शत्रुत्वच घ्यायचं असेल तर आता एकदाच युद्ध होऊन जाऊदे. या युद्धात आम्ही पाकव्याप्त काश्मीरही घेऊन टाकू.

  • Share this:

मथुरा, 9 ऑगस्ट : काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरबद्दल पाकिस्तानातले नेते रोज वेगवेगळी वक्तव्यं करत आहेत. पाकिस्तानने भारताला यावरून युद्धाचीही धमकी दिली. याला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आरपारची लढाई झाली तर भारत मागे हटणार नाही आणि भारत पाकव्याप्त काश्मीरचाही ताबा घेईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

उत्तर प्रदेशात मथुरामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदास आठवले म्हणाले, जर पाकिस्तानला शत्रुत्वच घ्यायचं असेल तर आता एकदाच युद्ध होऊन जाऊदे. या युद्धात आम्ही पाकव्याप्त काश्मीरही घेऊन टाकू.

'शत्रुत्व महागात पडेल'

भारताच्या ढाण्या वाघासमोर पाकिस्तान एखाद्या मांजरीसारखं आहे,असंही वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं. पाकिस्तान ज्या धमक्या देतं आहे ती निव्वळ बतावणी आहे,असंही ते म्हणाले. इम्रान खान यांना भारताशी शत्रुत्व महागात पडेल. आम्ही कोणत्याही क्षणाला सामोरं जायला तयार आहोत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने यावर तीव्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.भारताच्या उच्चायुक्तांना माघारी पाठवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. त्याबरोबरच समझौता एक्सप्रेसही रद्द केली.

वडिलांनी जग्वार घेऊन दिली नाही म्हणून ओढयात ढकलली BMW कार!

भारतासोबत व्यापारी संबंध थांबवण्याचीही घोषणा पाकिस्तानने केली. पाकिस्तानच्या याच आडमुठेपणावर रामदास आठवलेंनी त्यांच्याच शब्दांत त्यांना सुनावलं.

सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले मथुरेतल्या हॉस्पिटलमध्ये देहदान उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आले होते.त्यांनी लोकांना देहदानाचं महत्त्वही समजावून सांगितलं.

=============================================================================================

कोल्हापूरला पाण्यात बुडवणारे हेच ते अलमट्टी धरण, पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: August 9, 2019, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading