12 वर्षांखालील चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी,केंद्राकडून अध्यादेश जारी

12 वर्षांखालील चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी,केंद्राकडून अध्यादेश जारी

बारा वर्षाखालील मुलांच्या लैंगिक शोषणातील आरोपीला मृत्युदंड देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश जारी केलाय.

  • Share this:

दिल्ली, 21 एप्रिल : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एक मोठा निर्णय झालाय. पॉस्को कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला गेलाय. बारा वर्षाखालील मुलांच्या लैंगिक शोषणातील आरोपीला मृत्युदंड देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश जारी केलाय. 12 वर्षांखालील चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे.

अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्कारासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने लिखीत उत्तर दिलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालय २७ एप्रिलला पुढील सुनावणी करणार आहे.

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून संताप व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कठुआ बलात्काराची चर्चा सुरू आहे. अल्पवयीनांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहे.

दरम्यान, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी कठुआ बलात्कारावर बोलताना, या घटनेमुळे आपण अत्यंत हादरलो असून, अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आपलं मंत्रालय पॉस्को कायद्यात बदल करत असल्याचं सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 02:23 PM IST

ताज्या बातम्या